-
लग्नाआधीच प्रेग्नंट असणे हे बॉलिवूड अभिनेत्रींसाठी काही नवे नाही. अनेक वेळा अभिनेत्री लग्नाआधी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु असतात. श्रीदेवीं पासून ते नेहा धूपियापर्यंत अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधी प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात होते. चला पाहूया या यादीमधील काही अभिनेत्री…
-
बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिनने सप्टेंबर महिन्यात प्रेग्नंट असल्याचे एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. कल्कि चित्रपट निर्माता- दिग्दर्शक अनुराग कश्यपची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. त्यानंतर ती गाय हर्शबर्गला डेट करत आहे. ती लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे.
-
अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने १८ जुलै रोजी मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. अर्जुनने त्याच्या मुलाचे नाव अरिक असे ठेवले आहे. अर्जुन आणि गॅब्रिएलाने अद्याप लग्न केलेले नाही.
-
या यादीमध्ये अभिनेत्री नीना गुप्ता यांचा देखील समावेश असल्याचे म्हटले जाते.
-
चौकटी बाहेरील भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कोंकणा रणवीर शॉरीच्या प्रेमात पडली. त्यानंतर कोंकणा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर ती लग्न बंधनात अडकली आणि काही दिवसातच मुलाला जन्म दिला.
-
लग्नाआधी प्रेग्नंट असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये नेहा धूपीयाचा देखील समावेश आहे. नेहा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्यामुळे तिने गुपचूप लग्न केले असल्याचे म्हटले जाते.
-
सेलिना जेटली
-
अभिनेत्री लीजा हेडन देखील लग्नाआधी प्रेग्नंट होती. २०१६मध्ये तिने डिनो लालवानीशी लग्न केले आणि २०१७मध्ये तिने पहिल्या मुलाला जन्म दिला.
-
महिमा चौधरी देखील लग्नाआधी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या
एक,दोन नाहीतर तब्बल ७ वर्ष येणार मोठी संकटं; ‘या’ राशीच्या मागे असणार कडक शनि साडेसाती, नोकरी, संपत्ती, आरोग्याची हानी