
भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने १ जानेवारी २०२० ला आपली प्रेयसी नताशा स्टॅन्कोविच हिच्याशी साखरपुडा केला.

दुबईत एका बोटीवर हार्दिकने तिला प्रपोझ केलं आणि तिला अंगठी देत नात्याला 'रोमँटिक टच' दिला.

सध्या तिचं नाव सगळीकडे चांगलंच चर्चेत आहे. पण संपूर्ण क्रिकेटविश्वाला पडलेला प्रश्न म्हणजे नताशा नक्की आहे तरी कोण?

नताशा जरी मूळची सर्बियन असली तरी सध्या ती मुंबई-स्थित मॉडेल आहे.

नताशाचा जन्म सर्बियामध्ये ४ मार्च १९९२ ला झाला.

नताशा एक उत्तम डान्सर आहे. तिचं नृत्यकौशल्य रूपेरी पडद्यावर दिसलं आहे.

नर्तनासोबतच नताशा ही एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे.

नताशा अभिनेत्री बनण्यासाठी २०१२ साली मुंबईमध्ये आली.

प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या चित्रपटात तिने 'अय्यो जी' या गाण्यावर नृत्य केलं.

त्या चित्रपटातून तिची बॉलिवूडमध्ये 'एन्ट्री' झाली.

त्यानंतर नताशाच्या अभिनयाची झलक झिरो या चित्रपटात पाहायला मिळाली.

प्रसिद्ध संगीतकार बादशाहच्या 'डीजेवाले बाबू' या म्युझिक व्हिडीओमुळे ती अधिक प्रकाशझोतात आली.

हार्दिक आणि नताशा रिलेशनशीपमध्ये आहेत अशी चर्चा गेले अनेक दिवस होती.

१ जानेवारी २०२० रोजी या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी नात्याला आकार दिला.

हार्दिक-नताशाच्या चाहत्यांना आता त्यांच्या विवाहाचे वेध लागले आहेत.