प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेल्या ९० च्या दशकातील डिटेक्टिव्ह मालिका
- 1 / 7
९० च्या दशकात काही डिटेक्टिव्ह मालिकांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. शक्तीमानपासून कॅप्टन व्योम तर दुसरीकडे चंद्रकांतासारख्या मालिकाही लोकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. या मालिकांव्यतिरिक्त डिटेक्टिव्ह मालिकांनाही मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अशा काही मालिका आहे, ज्या प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहेत. (सर्व फोटो- सोशल मीडिया)
- 2 / 7
ब्योमकेश बक्षी : या मालिकेला शेर्लॉक होम्सचं भारतीय व्हर्जन मानलं जायचं. ९० च्या दशकात ही मालिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती. ब्योमकेश बक्षी हे एक बंगाली कॅरेक्टर होतं. शरदेन्दु बंदोपाध्याय यांनी यावर मालिका तयार केली होती. आजही प्रेक्षकांच्या मनात ही मालिका घर करून आहे.
- 3 / 7
सुराग: द क्लू - ही मालिका १९९९ मध्ये दर सोमवारी रात्री १० ते ११ च्या दरम्यान येत होती. सीआयडी पोलिसाच्या रूपातली सुदेश बेरी यांची एन्ट्री आजही सर्वांच्या लक्षात असेल. या मालिकेनंतर त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं. परंतु ही मालिका कधीही न विसरता येण्याजोगी आहे.
- 4 / 7
या सर्व मालिकांमध्ये जासूस विजय या मालिकेला विसरून चालणार नाही. या मालिकेच्या माध्यमातून केस सोडवण्याव्यतिरिक्त एड्सच्या बाबतीतही जनजागृती करण्यात येत होती. आदिल हुसैन यांनी या मालिकेत विजयची भूमिका साकारली होती. तर ओम पुरी हे या मालिकेत सूत्रधाराच्या भूमिकेत पहायला मिळाले होते.
- 5 / 7
डीडी मेट्रोवर येणारी राजा और रॅन्चो ही मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात असेल. यामध्ये वेद थापर यांनी राजाची भूमिका साकारली होती. तर ते रॅन्चो नावाच्या माकडाच्या मदतीनं अनेक केस सोडवत असत.
- 6 / 7
९० च्या दशकातली प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली आणखी एक मालिका म्हणजे तहकीकात. या मालिकेत विजय आनंद यांनी सॅम डिसिल्वाची तर सौरभ शुक्ला यांनी गोपीचंदची भूमिका साकारली होती.
- 7 / 7
करमचंद ही अनेकांना आजही आठवणारी मालिका आहे. पंकज कपूर यांनी ही भूमिका साकारली होती. डोळ्यांवर गॉगल आणि गाजर खात केस सोडवणं ही त्यांच्या कॅरेक्टरची खासीयत होती. आपल्या दशकातील एक कूल डिटेक्टिव्ह म्हणून ते कॅरेक्टर परिचयाचं होतं.