सोहा, श्रुती, समंथा… ‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थ ठरला होता ‘कॅसानोव्हा’
- 1 / 14
'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थ तामिळ सिनेसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जातो.
- 2 / 14
केवळ अभिनेताच नव्हे तर सिद्धार्थ आता निर्माता, पटकथालेखक व पार्श्वगायकसुद्धा आहे.
- 3 / 14
सिद्धार्थचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत होतं. अभिनेत्रींसोबत जोडलं गेलेलं नाव पाहून त्याला 'कॅसानोव्हा'च म्हटलं जात होतं.
- 4 / 14
२००३ मध्ये सिद्धार्थने बालमैत्रीण मेघनाशी लग्नगाठ बांधली. मात्र २००७ मध्ये हे दोघं विभक्त झाले. घटस्फोटाच्या एक वर्ष आधीपासून सिद्धार्थ-मेघना वेगवेगळे राहू लागले होते.
- 5 / 14
मात्र यापेक्षा सिद्धार्थचं सोहा अली खान, श्रुती हासन आणि समंथा रुथ प्रभू या अभिनेत्रींसोबतचं नातं जास्त चर्चेत होतं.
- 6 / 14
'रंग दे बसंती' चित्रपटादरम्यान एकत्र आलेले सोहा व सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. सोहामुळेच सिद्धार्थचा घटस्फोट झाला असं म्हटलं जातं. मात्र सिद्धार्थच्या चंचल स्वभावामुळे हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.
- 7 / 14
सोहाशी ब्रेकअप झाल्यानंतर काही महिन्यांतच सिद्धार्थचं नाव कमल हासन यांची मुलगी व अभिनेत्री श्रुती हासनशी जोडलं गेलं. २०११ मध्ये हे दोघं लिव्ह-इनमध्ये राहू लागले होते.
- 8 / 14
मात्र पाच महिने एकत्र राहिल्यानंतर ऑक्टोबर २०११ मध्ये सिद्धार्थ-श्रुतीचं ब्रेकअप झालं. त्यांचं नातं एक-दीड वर्षच टीकलं होतं.
- 9 / 14
श्रुतीशी ब्रेकअप झाल्यानंतर दोन वर्षांनंतर सिद्धार्थ व समंथा डेट करू लागले. तेलुगू चित्रपट 'जबरदस्त'च्या सेटवर या दोघांमध्ये प्रेम फुलू लागले होते.
- 10 / 14
दोन ते अडीच वर्षे या दोघांनी एकमेकांना डेट केलं होतं. समंथा सिद्धार्थच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. एका पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थने खास समंथासाठी डान्स परफॉर्म केला होता. मात्र काही कारणास्तव या दोघांचा ब्रेकअप झाला.
- 11 / 14
सिद्धार्थ कॅसानोव्हा असल्याची टीका समंथाच्या एका मैत्रिणीने केली होती. समंथाने जेव्हा नागार्जुनचा मुलगा नागचैतन्य अक्किनेनी याच्याशी लग्नाची घोषणा केली, तेव्हा सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिला टोमणा मारला होता.
- 12 / 14
दमदार अभिनय कौशल्य असूनही खासगी आयुष्यातील या चढ-उतारांचा परिणाम सिद्धार्थच्या करिअरवरही झाला.
- 13 / 14
त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांचे ऑफर्स नाकारले होते.
- 14 / 14
(सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ सिद्धार्थ)