-
योगासनांचा सराव करणे ही गोष्ट मोठ्यांसाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती लहान मुलांसाठीही महत्त्वाची आहे. यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यांची बुद्धी तीक्ष्ण बनते तसेच त्यांच्यातील सर्जनशील उर्मी प्रवाहित व्हायलाही प्रोत्साहन मिळते. योगसाधनेमुळे मुलांना आपल्या मनातील भीती, राग आणि उदासी यांच्यावर मात करता येते आणि त्यांचा आपल्या अंतर्मनावरील विश्वास दृढ होतो; अशाप्रकारे बुद्धी आणि मन यांची एकतानता साधली जाते. आता अनलॉक १.० चा टप्पा सुरू झाला असला तरीही मुलांच्या घराबाहेर पडण्यावर अजूनही निर्बंध आहे, त्यात ऑनलाइन क्लासेसशी जुळवून घेण्याची त्यांची धडपड सुरू आहे. अशा काळात निकेलोडियनने आपल्या मजेदार आणि शैक्षणिक मोहिमेद्वारे योगाला मुलांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपल्या ‘योगा से ही होगा’ नावाच्या या मोहिमेच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली आणि बळकट रोगप्रतिकारशक्तीच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आपल्या खास कार्टून्स कॅरेक्टर्सलाच कामाला लावलं आहे. (शब्दांकन: तेजश्री गायकवाड )
-
योगामुळे शरीराचे अधिक चांगेल भान येण्यास मदत होते, स्वत:वर अधिक चांगले नियंत्रण राखता येते, लवचिकता आणि मना-शरीरातील ताळमेळही साधता येतो. योगासनांचे अनेक फायदे आहेत, विशेषत: हायपरअॅक्टिव्ह मुले किंवा एकाग्रता साधू न शकण्याची समस्या असलेल्या मुलांसाठी तर योगासने अधिकच लाभदायी आहेत. आसनांच्या साथीने संगीताचे उपचार केल्यास मुलांचे मन शांत होण्यास मदत होते.
-
योगसाधनेमुळे मुलांना आपल्या मनातील भीती, राग आणि उदासी यांच्यावर मात करता येते आणि त्यांचा आपल्या अंतर्मनावरील विश्वास दृढ होतो
-
योगामुळे शरीराचे अधिक चांगेल भान येण्यास मदत होते
-
योगामुळे लवचिकता आणि मना-शरीरातील ताळमेळही साधता येतो
-
-
योगा हा लहान मुलांसाठी फायद्याचा आहे.
-
हायपरअॅक्टिव्ह मुले किंवा एकाग्रता साधू न शकण्याची समस्या असलेल्या मुलांसाठी अधिक फायद्याचा आहे
-
आसनांच्या साथीने संगीताचे उपचार केल्यास मुलांचे मन शांत होण्यास मदत होते
-
त्यामुळे या वर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त घरातील छोट्या मंडळींनाही योगा करण्यासाठी नक्की प्रोत्साहन द्या.

S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”