-

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहाता का उल्टा चष्मा. ही मालिका गेली १० ते १२ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कालाकरही चर्चेत असतो. आज आपण या मालिकेत बालकलाकार सोनूची भूमिका साकारणाऱ्या झील मेहता विषयी जाणून घेणार आहोत. तसेच झील आता कशी दिसते हे पाहणार आहोत…
-
माधवी व आत्माराम भिडे यांची एकुलती एक मुलगी सोनू भिडे. झील मेहताने सुरुवातीला सोनू ही भूमिका साकारली होती.
-
त्यावेळी ती केवळ ९ वर्षांची होती.
-
तिची मालिकेतील सोनू ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
-
शाळा आणि मालिकांचे चित्रीकरण झील योग्य पद्धतीने सांभाळत होती.
-
मात्र १०च्या परिक्षेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने २०१२मध्ये ही मालिका सोडली असल्याचे म्हटले जाते.
-
झीलचा जन्म मुंबईत झाला होता. पण ती मुळची गुजरातची आहे.
-
तिला वाचनाची आवड आहे.
-
तसेच तिला फिरायला प्रचंड आवडत असल्याचे म्हटले जाते.
-
झील आता अतिशय सुंदर दिसते.
-
ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
-
तिचे इन्स्टाग्रामवर सध्या ९ लाख फॉलोअर्स आहेत.
-
झील नंतर निधी भानूशालीने ही भूमिका साकारली होती. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यामुळे तिने या भूमिकेला रामराम ठोकला.
-
त्यानंतर पलक सिधवानी सोनूची भूमिका साकारत आहे.
Photos: तारक मेहतामध्ये सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता आता कशी दिसते? पाहा
पाहा
Web Title: Remember young sonu aka jheel mehta of taarak mehta ka ooltah chashmah avb