
छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. जवळपास तीन महिने ब्रेक घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून नवीन एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेचं जितकं कौतुक झालं, तितकीच त्याच्यावर टीकासुद्धा झाली. मालिकेत बबड्या अर्थात सोहमची भूमिका साकारणाऱ्या आशुतोष पत्कीची ही पहिलीच मालिका. बबड्याच्या भूमिकेवरून त्याला अनेकदा ट्रोलही केलं जातं पण पहिल्याच मालिकेतील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. मुलाला बबड्या म्हणून हाक मारणारी आणि त्याचे सर्व लाड पुरवणारी आई- आसावरी आसावरीची भूमिका निवेदिता सराफ यांनी साकारली असून प्रेक्षकांनी त्यांच्यावरही खूप प्रेमाचा वर्षाव केला. आसावरीची व्यक्तिरेखा साकारणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आसावरीनं खूप काही शिकवलं, पारितोषिकं दिली, असं म्हणत निवेदिता सराफ यांनी प्रेक्षकांचे आभार मानले होते. यात तेजश्रीने शुभ्रा ही भूमिका साकारली आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत निवेदिता सराफ यांच्यासोबतच गिरीश ओक, तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या मालिकेने टीआरपीच्या बाबतीतही बाजी मारली आहे. -
सोशल मीडियावर व्हायरल झालेले भन्नाट मीम्स
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम
‘अग्गंबाई सासूबाई’वर भन्नाट मीम्स व्हायरल; तुम्हीही पोट धरून हसाल
Web Title: Memes on popular marathi serial aggabai sasubai ssv