… म्हणून झालं हिंदुस्तानी भाऊचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद
- 1 / 15
हिंदुस्तानी भाऊ हे नाव सोशल मीडियावर फारचं चर्चेत असंत. सध्या हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. (सर्व फोटो - युट्यूब, संग्रहित)
- 2 / 15
बिग बॉसच्या १३ व्या सीजनमध्ये आपल्या अनोख्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या हिंदुस्तानी भाऊचा म्हणजेच विकास फाटकचा इंन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आला आहे.
- 3 / 15
हिंदुस्तानी भाऊच्या अकाऊंटला कविता कौशिकसह अनेक सेलिब्रिटींनी रिपोर्ट केलं होतं. त्यानंतर भडकाऊ भाषणामुळे इन्स्टाग्रामनं अकाऊंट बंद करण्याची कारवाई केली आहे.
- 4 / 15
यापूर्वी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं हिंदुस्तानी भाऊचा एक व्हिडीओ गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांना टॅग करत लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.
- 5 / 15
कुणालच्या या ट्विटला एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिक आणि फराह अली खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी रिपोर्ट केलं होतं.
- 6 / 15
लोकांना भडकावणं हा एक गुन्हा आहे आणि हे जमावासाठी केलं जात आहे. यामुळे हिंसाचार होऊ शकतो, असं कुणाल कामरानं म्हटलं होतं.
- 7 / 15
"व्हिडीओमध्ये जी व्यक्ती आहे ती अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहत आहे. संजय दत्तची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु गुजराती अॅक्सेंटमुळे तो ते करू शकत नाही. याच्या विरोधात कारवाई होईल अशी अपेक्षा आहे," असं ट्विच फराह अली खाननं केलं होतं.
- 8 / 15
बिग बॉसच्या १३ व्या सीझननंतर हिंदुस्तानी भाऊ खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला होता.
- 9 / 15
संजय दत्तला फॉलो करणारा भाऊ खऱ्या अर्थानं पाकिस्तानविरोधातील आपल्या व्हिडीओमुळे सर्वांच्या परिचयाचा झाला होता. त्यानंतर त्याला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
- 10 / 15
काही दिवसांपूर्वी हिंदुस्तानी भाऊनं एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या वेब सिरिजविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
- 11 / 15
हिंदुस्तानी भाऊनं एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर एक व्हिडीओदेखील शेअर केला होता.
- 12 / 15
दरम्यान, त्यांनं एका स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कामही केलं. या ठिकाणी त्याच्याकडे क्राईम बिट सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
- 13 / 15
'पहली फुर्सत से निकल' हा त्याचा डायलॉग सर्वांच्याच पसंतीस उतरला होता.
- 14 / 15
हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठकचा एक मुलगादेखील आहे. तो त्याच्या नावानं एक एनजीओदेखील चालवतो.
- 15 / 15
हिंदुस्तानी भाऊचे युट्यूबवर लाखो फॉलोअर्स आहेत.