तब्बल १२ वर्षांनंतर ‘तारक मेहता..’मधील कलाकार सोडणार मालिका?
- 1 / 10
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा.
- 2 / 10
ही अभिनेत्री म्हणजे अंजली मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहता असल्याचे म्हटले जात आहे.
- 3 / 10
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार नेहा मेहता मालिका सोडणार आहे.
- 4 / 10
तसेच तिने याबाबत मालिकेच्या निर्मात्यांनाही माहिती दिली असल्याचे म्हटले आहे.
- 5 / 10
त्यामुळे चाहत्यांना आता अंजली मेहताच्या भूमिकेत नेहा दिसणार नाही.
- 6 / 10
नेहाचे करिअरशी संबंधीत वेगळे प्लॅन असल्यामुळे ती मालिका सोडत असल्याचे म्हटले जात आहे.
- 7 / 10
तर दुसरीकडे तिला एका वेगळ्या मालिकेची ऑफर मिळाली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
- 8 / 10
२८ जुलै रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.
- 9 / 10
नेहा मेहता गेली १२ वर्षे मालिकेत अंजली हे पात्र साकारत होती.
- 10 / 10
मालिकेतील तिच्या डायट फूडच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.