सुशांतचं दु:ख विसरून पहिल्यांदा अंकिताच्या चेहऱ्यावर दिसलं हास्य; आईसोबत केली महालक्ष्मीची पूजा
- 1 / 15
गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे.
- 2 / 15
यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते.
- 3 / 15
महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.
- 4 / 15
अभिनेत्री अंकिता लोखंडेनंही आईसोबत मिळून महालक्ष्मीची पूजा केली आहे.
- 5 / 15
प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात.
- 6 / 15
पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते.
- 7 / 15
त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते.
- 8 / 15
आईसोबत मिळून अंकिताने ही पूजा केली आहे.
- 9 / 15
गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो.
- 10 / 15
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून ३ दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते
- 11 / 15
अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौरीपूजनाचे खूप सुंदर फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
- 12 / 15
अंकिताने लाल रंगाची साडी नेसली असून तिचा मराठमोळा लूक विशेष लक्ष वेधून घेत आहे.
- 13 / 15
दरवर्षी अंकिताच्या घरी महालक्ष्मीपूजन करण्यात येते.
- 14 / 15
(सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, अंकिता लोखंडे)
- 15 / 15
अंकिता लोखंडेसोबत तिची आई