डोंबिवलीची बॅकग्राऊंड डान्सर बनली सलमानची नायिका
- 1 / 15
२५ ऑगस्ट १९८४ रोजी डेजी शाहचा जन्म झाला. सुरुवातीला बॉलिवूडमध्ये ती ज्यूनिअर आर्टिस्ट होती. आधी तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर 'जय हो' चित्रपटातून ती सलमान खानची नायिका म्हणून मोठया पडद्यावर झळकली. (फोटो सौजन्य - डेजी शाह इन्स्टाग्राम)
- 2 / 15
मुंबईत जन्मलेली डेजी लहानाची मोठी इथेच झाली. विलेपार्ल्यात तिचे निम्मे शिक्षण झाले आणि निम्मे शिक्षण डोंबिवलीत झाले. वडिलांच्या नोकरीमुळे तिला डोंबिवलीत शिफ्ट व्हावे लागले.
- 3 / 15
डोंबिवली नंतर तिचे कुटुंब मालाडला शिफ्ट झाले. डेसीने मुंबईच्या खालसा कॉलेजमधून शिक्षण घेतले. काम करत असल्यामुळे डेजीला शेवटच्या वर्षाची परीक्षा देता आली नाही.
- 4 / 15
"एक काळ असता होता, जेव्हा मी न झोपता सलग १५ दिवस चित्रीकरण केले होते. मी सुट्टीवर कधी गेले होते, हे सुद्धा मला आठवत नाही" असे डेजी सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना म्हणाली. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.
- 5 / 15
कुटुंबाबद्दल बोलताना मिड डे शी बोलताना डेजी म्हणाली की, "आमचे छोटे सुखी कुटुंब आहे. आई, मोठी बहिण आहे. माझ्या मोठया बहिणीचे दीपालीचे लग्न झाले असून तिला दोन मुले आहेत. वडिलांचे २००७ साली ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले"
- 6 / 15
नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या ग्रुपमधून सहाय्यक डान्सर म्हणून डेजीने करीअरला सुरुवात केली. 'जमीन' आणि 'खाकी' या चित्रपटात तिने काम केले .
- 7 / 15
२००३ साली सलमान खानच्या 'तेरे नाम' चित्रपटात डेजीने डान्सर म्हणून काम केले. सलमान खानच्याच 'मेने प्यार क्यु किया' चित्रपटात डेजी बॅकग्राऊंड डान्सर होती. त्यावेळी सलमानचे डेजीवर लक्ष गेले व त्याने तिला अभिनयाकडे वळण्याचा सल्ला दिला.
- 8 / 15
बॉडीगार्ड चित्रपटात डेजीला करीना कपूर खानच्या मैत्रिणीच्या रोलसाठी विचारणा झाली होती. तिला तो रोल विशेष वाटला नाही त्यामुळे तिने ती ऑफर नाकारली.
- 9 / 15
त्यानंतर काही वर्षांनी जय हो चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी माध्यमांना मुलाखत देताना डेजीने 'बॉडीगार्ड' चित्रपटाला नकार दिल्याबद्दल खंत वाटत असल्याचे मान्य केले.
- 10 / 15
"फक्त सलमानला मी नाही म्हटले त्याचीच मला खंत वाटतेय. तुम्ही सलमानसोबत काम करा किंवा नका करु. पण त्याची तुमच्या आयुष्यातील उपस्थितीच भरपूर काही आहे" असे डेजीने म्हटले होते.
- 11 / 15
"फक्त सलमानला मी नाही म्हटले त्याचीच मला खंत वाटतेय. तुम्ही सलमानसोबत काम करा किंवा नका करु. पण त्याची तुमच्या आयुष्यातील उपस्थितीच भरपूर काही आहे" असे डेजीने म्हटले होते.
- 12 / 15
आपण बॉडीगार्ड चित्रपटाला का नकार दिला ? ते तिने नंतर सलमानला पटवून दिले. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण सलमानला नाही कसे बोलायचे, त्याची डेजी सात ते आठ दिवस तयारी करत होती.
- 13 / 15
डेजीने नकार दिला तेव्हा ओके म्हणाला पण त्याला डेजीने रोलला नकार देणे आवडले नव्हते. पुढे जय हो चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याने डेजीचा राग आला होता असे सांगितले.
- 14 / 15
सलमान खान सोबत मोठया पडद्यावर पदार्पण करुनही डेजी शाहच्या करीअरला म्हणावी तशी भरारी मिळू शकली नाही.
- 15 / 15
डेजीला नेमबाज होण्याची खूप इच्छा आहे. अलीकडेच नॅशनल रायफल असोशिएशन ऑफ इंडियाकडून रायफल शूटिंग लायसन्स मिळवणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली.