…तर कंगना डॉक्टर असती; जाणून घ्या कंगनाची शैक्षिणक पार्श्वभूमी
- 1 / 10
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर वातावारण तापलं असून अनेक स्तरातून तिच्या वक्तव्याचा विरोध करण्यात आला. (सर्व फोटो - फेसबुक)
- 2 / 10
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर तिनं मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर टीका केली होती. दरम्यान, वाद वाढल्यानंतर कंगना रणौतला व्हाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
- 3 / 10
व्हाय प्लस सुरक्षा मिळणारी कंगना ही पहिली चित्रपट अभिनेत्री आहे.
- 4 / 10
हिमाचल प्रदेशमधील छोट्या गावातून आलेल्या कंगनाला २००५ मध्ये महेश भट्ट यांच्या गॅगस्टर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
- 5 / 10
कंगनाचं खरं आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रणाणे आणि संघर्षमयही होतं.
- 6 / 10
आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंगना आपल्या घरातून पळून आली होती. तसंच मॉडेलिंग करण्यासाठी तिनं आपलं शिक्षण मधूनच सोडलं होतं. शिक्षण सोडल्यानंतर कंगनानं दिल्लीतील एलीट मॉडेलिंग एजन्सी जॉईन केली होती.
- 7 / 10
तिनं गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहून आपल्या कामाला सुरूवात केली होती. केवळ अभिनेत्री बनायचं असल्यामुळं तिनं वयाच्या १६ वर्षी घर सोडलं होतं.
- 8 / 10
कंगनानं डीएव्ही चंदीगडमध्ये शिक्षण घेतलं आहे. १२ वी नंतर तिनं पुढे शिक्षण घेतलं नाही. जर आपण अभिनेत्री नसतो तर आज आपण डॉक्टर असतो असं कंगनानं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
- 9 / 10
केवळ २२ वर्षी कंगनाला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या फॅशन या चित्रपटसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.
- 10 / 10
कंगना आपल्या अभिनयाव्यतिरिक्त आपल्या वक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत राहते. अनेक विषयांवरही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपलं मत व्यक्त करत असते.