
बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर हीचा आज वाढदिवस आहे. करीना आज चाळीस वर्षांची झाली. तिने वाढदिवसाच्या एक दिवस आधीच इंस्टावर पोस्ट लिहिली आहे (सर्व फोटो सौजन्य-करीना कपूर इन्स्टाग्राम अकाऊंट) -
मी वयाच्या चाळीशीत पदार्पण करते आहे. मला खूप प्रेम करायचं आहे, हसायचं आहे. मला ताकद देणाऱ्यांचे आभार आणि मी जशी आहे तशी महिला बनवणारे अनुभव आणि विचार यांचीही मी आभारी आहे असं करीनाने म्हटलंय.
-
करीना आणि करीश्मा कपूर या कपूर घराण्यातला दोन अभिनेत्रींच्या बालपणाचा फोटो. या दोघींना लोलो आणि बेबो अशी टोपण नावं आहेत.
-
करीनाचा हॉट आणि हिट अंदाज..
-
करीना कपूरने काही दिवसांपूर्वी हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.
-
करीनाने सैफशी लग्न केलं आहे. या दोघांची जोडी अनेकांना आवडते. टशन या सिनेमाच्या दरम्यान या दोघांचं प्रेम जमलं आणि त्यानंतर या दोघांनी लग्न केलं.
-
करीनाने लॉकडाउनच्या काळात आपल्याला बीचची आठवण येत असल्याचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये करीना बिकीनी लुकमध्ये आहे. यामुळे करीना चांगलीच ट्रोल झाली होती
-
बॉलिवूडमध्ये झीरो फिगरचा ट्रेंड सेट करणारी अभिनेत्री म्हणून करीना ओळखली जाते. करीना कपूरने टशन सिनेमासाठी वजन प्रचंड कमी केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. मात्र तिच्या झीरो फिगरची चर्चा आजही होते.
-
करीना आणि सैफ यांचा एक दिलखुलास फोटो
-
करीना आणि कतरिना कैफ. या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. करीनाला बेबो का म्हटलं जातं यामागेही एक किस्सा आहे.
-
करीना आणि करीश्मा या दोघीही सख्ख्या बहिणी. या दोघींना लहानपणी नावं मिळाली बेबो आणि लोलो करीना बेबो तर करीश्मा लोलो
-
करीना आणि करीश्मा या दोघींच्या या टोपण नावांना काही अर्थ नाही.. मात्र लहानपणीच ही नावं दिली गेल्याने ती त्यांना चिकटलीच.
-
करीना सोशल मीडियावर चांगलीच अ्ॅक्टिव्ह असते आणि विविध फोटोही पोस्ट करत असते.
-
करीना कपूरने रेफ्युजी या सिनेमातून पदार्पण केले. तिच्या सिनेकारकिर्दीलाही २० वर्षे झाली आहेत.
-
करीना कपूर ही कपूर घराण्यातली अभिनेत्री आहे. तिच्या घरातल्या चार पिढ्या अभिनय क्षेत्रात आहेत. रणधीर कपूर आणि बबिता यांची ती मुलगी आहे
-
दबंग सिनेमातील फेविकॉल या गाण्यात करीना
-
चमेली सिनेमातला करीनाचा खास अंदाज
-
एजंट विनोद, तलाश, हिरोईन, रा वन, बॉडीगार्ड, सत्याग्रह, असोका, गोलमाल ३, उडता पंजाब, बजरंगी भाईजान, ब्रदर्स, वीरे दी वेडिंग असे एकाहून एक सरस चित्रपट करीनाने दिले आहेत.
-
लाल सिंग चढ्ढा या सिनेमात करीना आमिर खान सोबत पुन्हा झळकणार आहे. या दोघांनी याआधी थ्री इडियट्स सिनेमात एकत्र काम केलं आहे.
-
करीनाने रोडसाईड रोमिओ या सिनेमात एका कार्टून कॅरेक्टरला तिचा आवाजही दिला आहे
-
करीनाचा मुलगा तैमूर हा चांगलाच चर्चेत असणारा सेलिब्रिटी किड आहे
-
करीना पुन्हा एकदा गरोदर आहे. सैफने यासंदर्भातली माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती.
-
बेबो आणि लोलो आई बबिता सोबत
-
करीना कपूरचा हॉट अंदाज
-
करीना कपूरने डान्स इंडिया डान्ससाठी जज म्हणूनही काम केलं आहे. तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
‘झीरो फिगर’ ट्रेंड आणणाऱ्या करीनाला ‘बेबो’ का म्हणतात?
Happy Birth Day करीना
Web Title: Why kareena kapoor nick name is bebo do you know scj