-
पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे सेलिब्रिटी हे अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अशा काही घटनाही घडल्या ज्यामध्ये सेलिब्रिटींनी चारचौघांसमोर मार खाल्ला. असे कोणकोणते सेलिब्रिटी आहेत ते पाहुयात.. (सर्व फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
-
बॉलिवूडमध्ये सीरिअल किसर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इम्रान हाश्मी याने एका मुलाखतीत कबूल केलं होतं की त्याच्या पत्नीने त्याला चारचौघांत कानाखाली मारली होती. माझी पत्नी माझ्याबाबत फार पोझेसिव्ह आहे, असं त्याने त्या मुलाखतीत म्हटलं होतं.
-
२०१३ मध्ये अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतला सर्वांसमोर कानाखाली मारली होती. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार त्यावेळी ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. एका नाइट क्लबमध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि अंकिताने तिथे सर्वांसमोर सुशांतच्या कानाखाली लगावली होती.
-
कलाकार आर्यन वैद्यलासुद्धा पत्नीसोबत झालेल्या वादानंतर सर्वांसमोर तिच्याकडून मार खावा लागला होता. आर्यन ज्याठिकाणी शूटिंग करत होता, तिथे पत्नी अॅलेंक्झँड्रिया पोहोचली आणि तिने सेटवर सर्वांसमोर त्याच्या कानाखाली लगावली.
-
'जॉली एलएलबी'सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी अभिनेत्री गीतिका कपूरचा मार खाल्ला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फार व्हायरल झाला होता. सुभाष यांची पत्नी डिंपल खरबंदा हिच्यासमोरच गीतिकाने त्यांच्या कानाखाली लगावली होती. त्यावेळी त्यांच्यावर गैरवर्तणुकीचाही आरोप होता.
-
'बिग बॉस' फेम अभिनेत्री गौहर खान रँप वॉक करत असताना एका व्यक्तीने रँपवर येऊन तिच्यावर हात उगारला. नंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्या व्यक्तीने स्पष्ट केलं, की गौहरने इस्लामच्या शिकवणीविरोधात जाऊन तोकडे कपडे परिधान केल्याने त्याने तिच्यावर हात उगारला होता.
-
तीन लग्न करणारा अभिनेता करण सिंह ग्रोवर त्याच्या प्रेम प्रकरणांमुळे नेहमीच चर्चेत राहिला. करणची दुसरी पत्नी जेनिफर विंगेट हिने एकदा त्याच्या कानाखाली लगावली होती. त्यामागचं कारण काय होतं हे मात्र स्पष्ट झालं नाही.
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी