प्राणघातक हल्ला झालेली अभिनेत्री मालवी मल्होत्रा आहे तरी कोण?
- 1 / 15
अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. कोकिलाबेन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. यानिमित्ताने मालवी मल्होत्राबद्दल जाणून घेऊयात
- 2 / 15
मालवीने चित्रपट, मालिका, जाहिरातींमध्ये काम केले आहे.
- 3 / 15
तिने बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केले आहे.
- 4 / 15
तिने 'हॉटेल मिलन' या चित्रपटात काम केले आहे.
- 5 / 15
या चित्रपटात कुणार रॉय आणि करिश्मा शर्मा मुख्य भूमिकेत होते.
- 6 / 15
पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
- 7 / 15
मालवीने छोट्या पडद्यावरील 'उडाण' या मालिकेत देखील काम केले आहे.
- 8 / 15
ondikku ondi आणि unadhan या तामिळ चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
- 9 / 15
मालवीने मासिकांसासाठी फोटोशूट देखील केले आहे.
- 10 / 15
ती केटी सौंदर्यप्रसाधने (Katie cosmetics) या ब्रँडची ब्रँड अँम्बेसेडर आहे.
- 11 / 15
मालवीचे 'शबनम की शायरी' हे यूट्यूब चॅनेलदेखील आहे.
- 12 / 15
मालवी ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
- 13 / 15
मालवीने लग्न करण्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
- 14 / 15
‘झी न्यूज इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी योगेश महिपाल सिंग याने आधी मालवीची दोन-तीन वेळा भेट घेतली होती. निर्माता असल्याचं सांगत त्याने मालवीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लग्नाची मागणी घातली. मालवीने लग्न करण्यास नकार दिल्याने योगेशने तिच्यावर चाकूने हल्ला केला.
- 15 / 15
सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास वर्सोवा परिसरात मालवीवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणानंतर मालवीने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.