‘बालिका वधूफेम अविका गौर डेट करत असलेला मिलिंद चंदवानी आहे तरी कोण?
- 1 / 16
'बालिका वधू' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अविका गौर. (सौजन्य : अविका गौर/ मिलिंद चंदवानी इन्स्टाग्राम पेज)
- 2 / 16
अविकाने 'बालिका वधू' या मालिकेत आनंदी या बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तेव्हापासून अविका प्रकाशझोतात आली आहे.
- 3 / 16
आज अविकाचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
- 4 / 16
अविकादेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
- 5 / 16
सोशल मीडियावर सक्रीय असणारी अविका सध्या तिच्या रिलेशनशीपमध्ये चर्चेत आली आहे.
- 6 / 16
अविकाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
- 7 / 16
अविकाने तिच्या प्रियकरासोबत एक खास फोटो शेअर करत त्याच्यासाठी पोस्टदेखील लिहिली आहे.
- 8 / 16
अविकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिचा प्रियकर नेमका कोण आहे हा एकच प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.
- 9 / 16
अविका मिलिंद चंदवानी याला डेट करत आहे.
- 10 / 16
मिलिंद चंदवानी आयटी क्षेत्रात काम करत असून तो रोडीजमध्येही झळकला आहे.
- 11 / 16
मिलिंद आणि अविका यांची पहिली भेट एका एनजीओच्या वर्कशॉपमध्ये झाली होती.
- 12 / 16
अविकाची पोस्ट पाहिल्यानंतर मिलिंदने देखील त्याच अंदाजात तिला उत्तर दिलं आहे.
- 13 / 16
सध्या मिलिंद आणि अविका यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
- 14 / 16
अविकाने आतापर्यंत मिलिंदसोबत अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
- 15 / 16
अविका सध्या २२ वर्षांची असून गेल्या काही वर्षांमध्ये तिच्यामध्ये अनेक बदल झाल्याचं दिसून येत आहे.
- 16 / 16
'बालिका वधू'प्रमाणेच तिने 'ससुराल सिमर का' या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.