खणाची साडी, नथ…सई लोकूरचा दिवाळी स्पेशल लुक पाहिलात का?
- 1 / 5
सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सेलिब्रेशनमध्ये आपल्या मराठी अभिनेत्री कशाबरं मागे राहतील??
- 2 / 5
मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूरने दिवाळीनिमीत्त खास पारंपरिक खणाच्या साडीतलं आपलं फोटोसेशन चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. (फोटो सौजन्य - सई लोकूर इन्स्टाग्राम अकाऊंट)
- 3 / 5
पारंपरिक मराठमोळ्या वेशात सईचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.
- 4 / 5
दिवाळी म्हटलं की प्रत्येक स्त्री ला साडी नेसून मिरवण्यात आनंद वाटतो. त्यात नथ सोबतीला असेल तर सोन्याहून पिवळंच...
- 5 / 5
काही दिवसांपूर्वी सईचा तीर्थदीप रॉय या तरुणासोबत साखरपुडा सोहळा पार पडला असून नुकतीच सईची बॅचलरेट पार्टीही पार पडली.