अभिनेत्री होण्यापूर्वी निम्रत करायची हे काम; मिळत होता इतका पगार
- 1 / 10
बॉलिवूड सिनेसृष्टीवर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 2 / 10
ही इंडस्ट्री सेलिब्रिटी किड्सला पहिलं प्राध्यान्य देते, असं म्हटलं जात परंतु या गटबाजीच्या वातावरणातही काही कलाकार फिल्मी बॅकग्राऊंड नसाताही स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 3 / 10
निम्रत कौर ही अशाच महत्वाकांक्षी कलाकारांपैकी एक आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 4 / 10
प्रचंड संघर्ष करुन तिने या झगमगत्या दुनियेत स्वत: स्थान निर्माण केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 5 / 10
निम्रतने दिल्लीतील एका कार प्रदर्शन कार्यक्रमात पहिल्यांदा काम केलं होतं. त्यावेळी ती २० वर्षांची होती. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मंडळींना तिने त्या कारची वैशिष्ट्य समजावून सांगितली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 6 / 10
या कामासाठी तिला १० हजार रुपयांचा पगार मिळाला होता. हे पैसे तिने आपली कॉलेजची फी भरण्यासाठी वापरले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 7 / 10
निम्रत ही बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 8 / 10
२००५ साली यहा या चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने एका पत्रकाराची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 9 / 10
त्यांनंतर वन नाईट विथ किंग, एनकाऊंटर, पेडलर्स, द लंचबॉक्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 10 / 10
चित्रपटांसोबतच तिने 'तेरा मेरा प्यार', 'ये क्या हुआ' या म्यूझिक अल्बममध्येही काम केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)