नवीन वर्ष लग्नसराईचं; २०२१ मध्ये लग्नगाठ बांधण्यासाठी हे मराठी कलाकार सज्ज
- 1 / 15
नवीन वर्षात अनेक सेलिब्रिटी लग्नगाठ बांधणार आहेत. त्यापैकी मराठीतील कोणते कलाकार बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज आहेत ते पाहुयात..
- 2 / 15
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही २०२१ मध्ये कुणाल बेनोडेकरशी लग्न करणार आहे. कुणाल कामानिमित्त दुबईत राहतो.
- 3 / 15
फेब्रुवारी महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला. पुढच्या वर्षी उन्हाळ्यात या दोघांचं लग्न होणार असल्याचं समजतंय.
- 4 / 15
सोनालीने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.
- 5 / 15
रुपाली भोसले आणि अंकित मगरे गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत.
- 6 / 15
हे दोघंसुद्धा नवीन वर्षात लग्नगाठ बांधणार असल्याचं कळतंय.
- 7 / 15
अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांचा साखरपुडा नुकताच पार पडला.
- 8 / 15
अभिज्ञा आणि मेहुलचं हे दुसरं लग्न असून २०२१ मध्ये हे दोघं लग्नगाठ बांधणार आहेत.
- 9 / 15
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला.
- 10 / 15
प्रदीप प्रोफेशनल बॉक्सर आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारीत हे दोघं लग्न करणार आहेत.
- 11 / 15
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात साखरपुडा पार पडला.
- 12 / 15
करोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. आता नवीन वर्षात हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.
- 13 / 15
पूजा ठोंबरे आणि कुणार अहिरराव हे गेल्या आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
- 14 / 15
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला.
- 15 / 15
ही जोडीसुद्धा नवीन वर्षात आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.