…तेव्हा नवऱ्याच्या वागण्याला कंटाळाल्या होत्या ‘द्रौपदी’ साकारणाऱ्या रुपा गांगुली
- 1 / 10
रुपा गांगुली म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व. काल २५ नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस होता. अभिनेत्री, गायिका ही त्यांची मूळ ओळख.पण आता त्या राजकारणातही सक्रीय आहेत. (सर्व फोटो सौजन्य - रुपा गांगुली इन्स्टाग्राम)
- 2 / 10
आजही सर्वसामान्य रुपा गांगुली यांना 'द्रौपदी' म्हणून ओळखतात. बी.आर.चोप्रा यांच्या 'महाभारत'मध्ये त्यांनी साकारलेली द्रौपदीची व्यक्तीरेखा आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. हे त्यांच्या अभिनयाचे यश आहे.
- 3 / 10
२०१६ साली रुपा गांगुली यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी भाजपाच्या महिला मोर्चाची जबाबदारी संभाळली आहे. पश्चिम बंगालमध्ये चित्रपट सृष्टीत यशस्वी ठरलेले कलाकार नंतर राजकारणाकडे वळतात असा अनुभव आहे. रुपा गांगुली सुद्धा या परंपरेला अपवाद नाहीत.
- 4 / 10
भाजपा खासदार रुपा गांगुली आपल्या व्यक्तीगत आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत राहिल्या आहेत. १९९२ साली त्यांनी पेशाने मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या ध्रुव मुखर्जी बरोबर विवाह केला. पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.
- 5 / 10
माझ्या अभिनेत्री असण्यावर नवऱ्याला आक्षेप होता. मी अभिनेत्री असल्यामुळे पती आनंदी नव्हते असे रुपा गांगुली यांनी त्यांच्या घटस्फोटावर बोलताना सांगितले होते.
- 6 / 10
ध्रुव मुखर्जी यांच्या दबावामुळे मी अभिनय सोडला होता. पण त्यानंतरही अडचणी कमी झाल्या नाहीत, असे 'सच का सामना' या रियलिटी शो मध्ये रुपा गांगुली यांनी सांगितले होते.
- 7 / 10
नवरा मला लहान-मोठया खर्चासाठी सुद्धा पैसे देत नव्हता. त्यामुळे कंटाळून अखेर २००९ साली मी घटस्फोट घेतला असे रुपा गांगुली यांनी सांगितले होते.
- 8 / 10
ध्रुव मुखर्जीपासून रुपा गांगुली यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव आकाश मुखर्जी आहे. गायक दिव्येंदु सोबतही रुपा गांगुली यांचे नाव जोडले गेले होते. दिव्येंदुसोबत त्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होत्या, असे मीडिया रिपोर्टसमध्ये म्हटले होते.
- 9 / 10
रुपा गांगुली हे बंगाली चित्रपट सृष्टीतील एक मोठे नाव आहे. राष्ट्रीय पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
- 10 / 10
रुपा गांगुली यांनी २०१५ साली भाजपामध्ये प्रवेश केला व २०१६ साली पक्षाने त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले.