हृतिकचं १०० कोटीचं घर, अर्शदचा पोर्तुगीज व्हिला ते फ्लॅट या वर्षातील बॉलिवूड स्टार्सच्या घर खरेदीबद्दल जाणून घ्या…
- 1 / 10
आयुषमान आणि ताहिरा कश्यप खुरानाने चंदीगड जवळच्या पंचकुलामधील सेक्टर सहा मध्ये घर विकत घेतले आहे. संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र राहण्यासाठी एक नवे घर खरेदी केले आहे. (फोटो सौजन्य - आयुषमान इन्स्टाग्राम)
- 2 / 10
एअरलिफ्ट फेम निम्रत कौर सध्या सांताक्रूझमध्ये राहते. तिने वांद्रयामध्ये नवीन घर विकत घेतले आहे. लॉकडाऊनमुळे तिला एप्रिलमध्ये तिथे शिफ्ट होता आले नाही. आता लवकरच ती तिच्या नव्या घराची मनाप्रमाणे सजावट करुन तिथे शिफ्ट होईल. (फोटो सौजन्य - निम्रत कौर इन्स्टाग्राम)
- 3 / 10
लॉकडाऊन होण्याआधी यामी गौतमच्या कुटुंबीयांनी नवीन घर विकत घेतले. तिथे ते शिफ्ट होणार होते. पण त्याचवेळी लॉकडाऊन जाहीर झाला. चंदीगडमध्ये त्यांनी हे घर विकत घेतले आहे. लवकरच सर्व कुटुंबीय आता तिथे शिफ्ट होतील. (फोटो सौजन्य - यामी गौतम इन्स्टाग्राम)
- 4 / 10
तापसी पन्नू मुंबईमध्ये रहाते. सध्या ती ज्या इमारतीत राहते, तिथेच तिने आणखी एक नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. (फोटो सौजन्य - तापसी पन्नू इन्स्टाग्राम)
- 5 / 10
दिवाळीच्या आदल्यादिवशी रिचा चड्ढा नव्या घरामध्ये शिफ्ट झाली. जुहू येथे तिने एका रो हाऊस घेतले आहे. लवकरच ती अली फझल बरोबर विवाहबद्ध होणार आहे. . (फोटो सौजन्य - रिचा चड्ढा इन्स्टाग्राम)
- 6 / 10
वेब सीरिजमधला सध्याचा लोकप्रिय चेहरा म्हणजे विक्रांत मेस्सी. दिवाळीच्या मुहूर्तावर विक्रांत त्याच्या नव्या घरामध्ये शिफ्ट झाला. . (फोटो सौजन्य - विक्रांत मेस्सी इन्स्टाग्राम)
- 7 / 10
नुसरत भरूचाने तिच्यासाठी नवीन घर विकत घेतले आहे. अलीकडेच ती जुहूमधल्या तिच्या नव्या घरात शिफ्ट झाली. या नव्या घरासाठी लागणारे साहित्य, पडदे खरेदी करण्यामध्ये ती व्यस्त होती. (फोटो सौजन्य - नुसरत भरूचा इन्स्टाग्राम)
- 8 / 10
रकुल प्रीत सिंगने वांद्रयामध्ये नवीन घर घेतले आहे. या नव्या घराची सजावट करण्यासाठी रकुलला कामातून काही दिवसांची सुट्टी हवी आहे. (फोटो सौजन्य - रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)
- 9 / 10
सुट्टीमध्ये कुठे जायचं? असा आपल्याला प्रश्न पडतो. अर्शद वारसीने गोव्यामध्ये कुटुंबासोबत सुट्ट्या घालवण्यासाठी एक पोर्तुगीज व्हिला विकत घेतला आहे. (फोटो सौजन्य - अर्शद वारसी इन्स्टाग्राम)
- 10 / 10
मुंबईत जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील एका इमारतीत बॉलिवूडचा स्टार हृतिक रोशनने दोन अपार्टमेन्ट खरेदी केले आहेत. याची किंमत १०० कोटीच्या घरात आहे. (फोटो सौजन्य - हृतिक रोशन इन्स्टाग्राम)