वर्षभरात ‘या’ मराठी कलाकारांच्या निधनाच्या वृत्ताने दिला चाहत्यांना धक्का
- 1 / 6
२०२० हे वर्ष करोना व्हायरसचं मोठं संकट घेऊन आलं. त्यातच वर्षभरात काही मराठी कलाकारांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना व सिनेसृष्टीला मोठा धक्का दिला.
- 2 / 6
आशालता वाबगावकर- करोनाची लागण झाल्यानंतर मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं २२ सप्टेंबर रोजी निधन झालं. त्या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांना करोनाची लागण झाली होती.
- 3 / 6
आशुतोष भाकरे- अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती व अभिनेता आशुतोष भाकरेच्या आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. नैराश्यामुळे आशुतोषने हे टोकाचं पाऊल उचललं होतं. 'भाकर', 'इचार ठरला पक्का' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या.
- 4 / 6
कमल ठोके- 'लागीरं झालं जी' या मालिकेत जिजी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं दीर्घ आजाराने ऐन दिवाळीत निधन झालं होतं. मराठी कला क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका अशी कमल ठोके यांची ओळख होती. १४ नोव्हेंबरला बंगळुरू याठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- 5 / 6
जयराम कुलकर्णी- मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे मार्च महिन्यात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या.
- 6 / 6
चंद्रकांत गोखले- विक्रम गोखले यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांनी जूनमध्ये अखेरचा श्वास घेतला. साधी माणसं, सुहाग रात, रावसाहेब, हिरासत आणि लोफर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या.