खऱ्या आयुष्यातही हॉकीपटू असलेल्या ‘चके दे’ फेम कोमल चौटालाच्या हॉट आणि बोल्ड अदा
- 1 / 10
शाहरुख खानच्या २००७ साली आलेल्या 'चक दे इंडिया' चित्रपटाने अनेकांना ओळख मिळवून दिली. यात कोमल चौटाला एक नाव आहे. हॉकी खेळण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या कोमल चौटालाने त्यावेळी सर्वांची मने जिंकून घेतली होती. चित्रपटात कोमलची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीचे मूळ नाव आहे चित्राशी रावत. (सर्व फोटो सौजन्य - चित्राशी रावत इन्स्टाग्राम)
- 2 / 10
चित्राशी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही हॉकीपटू आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी ती राष्ट्रीय स्तरावरची हॉकीपटू होती. हॉकी खेळण्याच्या तिच्या कौशल्यामुळेच तिला चक दे मध्ये रोल मिळाला. या चित्रपटात तिने हरयाणातील एका गावातून आलेल्या मुलीची व्यक्तीरेखा साकारली होती.
- 3 / 10
चित्राशी लहानपणापासून हॉकी खेळतेय. वयाच्या १७ व्या वर्षापासून तिने उत्तराखंडसाठी हॉकी खेळायला सुरुवात केली.
- 4 / 10
मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये रोलसाठी ऑडिशन दिल्यानंतर चित्राशीची या चक दे मध्ये कोमल चौटालाच्या रोलसाठी निवड झाली.
- 5 / 10
चक दे इंडिया चित्रपटामुळे चित्राशीचे आयुष्यच बदलून गेले. तिला एक ओळख मिळाली. हा चित्रपट भारतात सुपरडुपर हिट ठरला होता.
- 6 / 10
प्रियांका चोप्रा आणि कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेला फॅशन हा चित्राशीचा दुसरा चित्रपट. मधुर भांडारकरच्या या चित्रपटात फॅशन कोऑर्डिनेटरचा रोल तिने केला होता.
- 7 / 10
फॅशनमध्ये तिची भूमिका छोटी होती. पण २००९ मध्ये लक चित्रपटातही तिला संधी मिळाली. संजय दत्त, इम्रान खान आणि श्रुती हसन यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. चित्राशीला या चित्रपटात चांगला रोल मिळाला. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल दाखवू शकला नाही.
- 8 / 10
ये दुरिया, ब्लॅक होम आणि तेरे नाल लव्ह हो गया या चित्रपटातही सोनाक्षीने अभिनय केला.
- 9 / 10
मोठया पडद्यानंतर छोटया पडद्यावरही तिने नशीब आजमावून पाहिले. FIR मालिकेत ज्वालामुखी चौटला ही पोलीस निरीक्षकाची व्यकीरेखा साकारली. हा शो २० वर्ष पुढे गेला होता. चंद्रमुखी चौटालाची मुलगी ज्वालामुखी चौटालाची व्यक्तीरेखा तिने रंगवली.
- 10 / 10
चित्राशी सोशल मीडियावरही मोठया प्रमाणावर सक्रिय असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.