सात जन्माचं नातं… आदित्य नारायण, श्वेता अग्रवाल अडकले विवाहबंधनात
- 1 / 10
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल हे विवाहबंधनात अडकले आहे. त्यांच्या विवाह सोहळ्यानंतरचे काही फोटो समोर आले आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
- 2 / 10
काही दिवसांपूर्वीच आदित्य नारायणनं आपल्या नात्याबद्दल सर्वांच्या समोर उलगडा केला होता. ( फोटो - आदित्य नारायण, इन्स्टाग्राम)
- 3 / 10
आदित्य नारायण त्याची मैत्रीण श्वेता अग्रवाल हिच्यासोबत १ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकला. १ डिसेंबर रोजी उदित नारायण यांचा वाढदिवसदेखील आहे. ( फोटो - आदित्य नारायण, इन्स्टाग्राम)
- 4 / 10
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्याच लोकांना विवाह सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आलं होतं.
- 5 / 10
‘शापित’ या चित्रपटाच्या सेटवर आदित्य आणि श्वेताची ओळख झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं होतं. ( फोटो सौजन्य - योगेन शाह)
- 6 / 10
गेल्या १० वर्षांपासून आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल हे दोघे एकमेकांना ओळखतात.
- 7 / 10
श्वेता अग्रवाल हीदेखील एक अभिनेत्री आहे. तिनं काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
- 8 / 10
‘मी माझं नातं कधी लपवून ठेवलेलं नाही. पण एक वेळ अशी आली की आमच्याबद्दल जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही यावर न बोलण्याचा विचार केला होता’ असं आदित्यनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. ( फोटो सौजन्य - योगेन शाह)
- 9 / 10
आदित्य हा प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे. तो देखील गायक आणि अभिनेता आहे. ( फोटो सौजन्य - योगेन शाह)
- 10 / 10
आदित्यनं रिअॅलिटी शो इंडियन आयडलचं सूत्रसंचालनदेखील केलं आहे. ( फोटो सौजन्य - योगेन शाह)