तू विसरलास??; टप्पूच्या ‘त्या’ फोटोवर बबिताची कमेंट
- 1 / 11
छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक पात्र हे घराघरात पोहोचलेलं आहे. (सर्व फोटो- इन्स्टाग्राम व सोशल मीडिया)
- 2 / 11
या मालिकेतील ‘बबीता’ची भूमिका फारच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता काही दिवसांपासून चर्चेत आहे.
- 3 / 11
'तारक मेहता...'मध्ये टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट याच्याशी तिचं अफेअर असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत.
- 4 / 11
काही दिवसांपूर्वी हे दोघे जण एकत्र बाहेर फिरायला गेले असतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला होता.
- 5 / 11
हे दोघे एकमेकांमा डेट करत असल्याच्याची चर्चा त्या फोटोंनंतर रंगल्याचं दिसून आलं.
- 6 / 11
आता एका नव्या कारणामुळे हे दोघे चर्चेत आले आहेत.
- 7 / 11
राजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
- 8 / 11
या फोटोमध्ये त्याने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून तो खूपच हँडसम दिसतोय.
- 9 / 11
राजने पोस्ट केलेल्या फोटोला त्याने 'चांगली हेअरस्टाईल, चांगला मूड आणि चांगला दिवस' असं कॅप्शन दिलं.
- 10 / 11
बबिताला मात्र या कॅप्शनमधील एक गोष्ट खटकली. तिने लगेच फोटोवर कमेंट करत, तू 'चांगला शर्ट' ही गोष्ट लिहायची विसरलास, अशी तिने कमेंट केली. या कमेंटसोबतच तिने प्रेम व्यक्त करणारा इमोजीदेखील वापरला.
- 11 / 11
छोट्या पडद्यावरील टप्पू आणि बबिता डेट करत असल्याच्या चर्चा असल्या तरी या दोघांनी अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.