‘स्वामिनी’मधल्या रेवतीचा ‘खण’खणीत लूक
- 1 / 6
सध्या खणाचा फॅशन ट्रेण्डमध्ये आहे. बाजारात साडीपासून ते कंदील आणि तोरणांपर्यंत सगळंच खणाचं पाहायला मिळतंय.
- 2 / 6
'स्वामिनी' या लोकप्रिय मालिकेत रमाबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रेवती लेले हिलासुद्धा खणाची भुरळ पडली आहे.
- 3 / 6
जांभळ्या रंगाची खणाची साडी, त्यावर राखाडी रंगाचा ब्लाऊज आणि सिल्व्हर दागिने असा रेवतीचा साज पाहायला मिळतोय.
- 4 / 6
हल्ली खणाच्या साडीवर शोभेल असा लूक न ठेवता काहीसं अनमॅच करण्याकडे तरुणींचा कल आहे आणि तो रेवतीच्या ब्लाऊजच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवतो.
- 5 / 6
हल्ली खणाच्या साडीवर रंगीत पारंपरिक व आधुनिक नक्षीकाम करण्यावर भर आहे. यामध्ये नथ, कोयरी आणि मोराची नक्षी ट्रेण्डमध्ये आहे. रेवतीच्या साडीवर नथीचं सुंदर नक्षीकाम पाहायला मिळतंय.
- 6 / 6
(सर्व छायाचित्र सौजन्य - इन्स्टाग्राम/ रेवती लेले)