सई लोकूरच्या मेहंदीवरील गाडीच्या डिझाइनने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
- 1 / 12
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूरने ३० नोव्हेंबर रोजी तिर्थदीप रॉयशी लग्नगाठ बांधली.
- 2 / 12
अत्यंत मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.
- 3 / 12
सईने सध्या तिच्या मेहंदी कार्यक्रमातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
- 4 / 12
सईच्या हातावरील मेहंदीमधल्या एका गाडीच्या चित्राने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
- 5 / 12
सईच्या उजव्या हातावरील मेहंदीच्या नक्षीमध्ये एका गाडीचं चित्र दिसून येत आहे.
- 6 / 12
सईनेच मेहंदी काढणाऱ्या तिच्या मैत्रिणीला हातावर गाडी काढण्याची विनंती केली.
- 7 / 12
सईच्या आईवडिलांनी तिला एक गाडी भेट दिली आहे. त्याचंच चित्र तिने हातावर काढायला सांगितलं आहे.
- 8 / 12
लग्नानंतर हनिमूनला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु सध्या करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सई आणि तीर्थदीप यांनी हनिमूनला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
- 9 / 12
लग्नाच्या आधीपासून सई आणि नवऱ्यासोबतचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत होती.
- 10 / 12
मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून सईची तीर्थदीपशी ओळख झाली.
- 11 / 12
सई व तीर्थदीप
- 12 / 12
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, सई लोकूर