टप्पूसोबत नाव जोडलं जाणाऱ्या ‘बबिता जी’ चाहत्यांना कधी नाराज करत नाही कारण….
- 1 / 10
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे बबिता जीं ची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ता. (सर्व फोटो सौजन्य - मुनमुन दत्ता इन्स्टाग्राम )
- 2 / 10
मुनमुन दत्ता सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांच व्यक्तीगत आयुष्य आणि अदा या बद्दल प्रेक्षकांना बरेच कुतूहल आहे.
- 3 / 10
मुनमुन दत्ताने २००४ साली 'हम सब बाराती ' या मालिकेतून छोटया पडद्यावर डेब्यु केला. त्यानंतर त्या कमल हसनच्या मुंबई एक्स्प्रेस चित्रपटात दिसल्या. मुनमुन यांनी अक्षय कुमारच्या हॉलिडे चित्रपटातही काम केले आहे.
- 4 / 10
पण २००८ साली आलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. आज सर्वजण त्यांना बबिता जी म्हणूनच ओळखतात. अय्यर बरोबरचा त्यांचा संसार आणि जेठालाल या तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खळखळून हसवते.
- 5 / 10
मुनमुन दत्ता फिटनेसवर विशेष मेहनत घेते. नियमित जीम आणि वर्कआऊट सुरु असतो. मुनमुन दत्ता सध्या राजा अनादकट बरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आहे.
- 6 / 10
मुनमुन दत्ताच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होते पण अजूनही त्या अविवाहित आहेत. आयुष्यसोबत घालवण्यासाठी योग्य व्यक्ती मिळेल, तेव्हा लग्न करीन असे मुनमुन दत्ताने सांगितले.
- 7 / 10
मुनमुन दत्ता ऐशोआरामी आयुष्य जगते. तिच्याकडे BMW कार आहे तर मुंबईत आलिशान फ्लॅट आहे.
- 8 / 10
मुनमुन दत्ताला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या प्रत्येक भागात काम करण्यासाठी ३५ हजार रुपये मानधन मिळते.
- 9 / 10
मुनमुन दत्ता सरळ स्वभावाच्या आहेत. त्या आपल्या चाहत्यांना कधीही नाराज करत नाहीत. चाहत्यांना त्यांची स्वाक्षरी हवी असेल किंवा सेल्फी काढायचा असेल तर त्या नकार देत नाहीत.
- 10 / 10
'तारक मेहता...'मध्ये टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट याच्याशी तिचं अफेअर असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी हे दोघे जण एकत्र बाहेर फिरायला गेले असतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला होता.