आमिर खानच्या मुलीने शेअर केले बिकिनीमधील बोल्ड फोटो; म्हणाली, “कधीतरी…”
- 1 / 10
अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सध्या तिच्या सोशल नेटवर्कींग अकाऊंटवरुन शेअर करण्यात येणाऱ्या काही बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिने शेअर केलेले हे बोल्ड फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असतात.
- 2 / 10
असेच काही फोटो इराने पुन्हा एकदा सोशल नेटवर्कींगवर शेअर केलेत. इराने इन्स्ताग्रामवर काही फोटो शेअर केले असून ते चर्चेचा विषय ठरत आहेत.
- 3 / 10
इराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये दिसून येत आहे. तिने फोटो पोस्ट केल्यानंतर काही तासांमध्येच या फोटोंना हजारोंच्या संख्येने लाईक्स आहेत.
- 4 / 10
इराने पोस्ट केलेले फोटो अवघ्या पाच तासांमध्ये २७ हजारहून अधिक जणांनी लाईक केले आहेत. तर याच फोटोंवर शेकडो लोकांनी कमेंट्सही केल्यात.
- 5 / 10
मला सध्या खूप काम आहे. मात्र कधीतरी तुम्हाला स्वत:साठी थोडा वेळ काढण्याची गरज असते. आता मी पुन्हा कामाला जात आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात, असं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये इराने लिहिलं आहे.
- 6 / 10
या फोटोंच्या माध्यमातून इराने आपल्या चाहत्यांना स्वत:साठी व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ नक्की काढत जा असा संदेश दिला आहे.
- 7 / 10
इराच्या चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट करुन तू खूप सुंदर दिसत आहेस, गोंडस वाटतेयस अशा कमेंट करण्याबरोबरच फायर आणि किस इमोन्जीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
- 8 / 10
इरा इन्स्ताग्रामवर प्रचंड सक्रीय आहे. ती अनेकदा आपले फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत असते.
- 9 / 10
कधी योगा, तर कधी फोटोशूटचे फोटो इरा इन्स्ताग्रामवर पोस्ट करताना दिसते.
- 10 / 10
इराचे इन्स्ताग्रमावर साडेतीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो instagram/khan.ira वरुन साभार)