…म्हणून नेहाने प्रपोज केल्यानंतर रोहनने दिला होता लग्नाला नकार
- 1 / 15
प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचं लग्न होऊन आता बराच काळ उलटून गेला आहे. मात्र, अजूनही त्यांच्या लग्नाची चर्चा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. ( सौजन्य : नेहा कक्कर इन्स्टाग्राम पेज)
- 2 / 15
नेहा रोहनच्या लग्नापासून ते त्यांच्या हनिमूनपर्यंत प्रत्येक गोष्ट चर्चेत राहिली. या सगळ्यात आता नवीन चर्चा रंगली आहे, ती म्हणजे त्यांच्या लव्हस्टोरीच्या सुरुवातीची.
- 3 / 15
अलिकडेच नेहा आणि रोहनप्रीतने द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
- 4 / 15
कपिल शर्माच्या मंचावर नेहा आणि रोहनप्रीतने त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला.
- 5 / 15
या शोमध्ये रंगलेल्या चर्चांमध्ये नेहाने तिची आणि रोहनप्रीतच्या लव्हस्टोरीचा उलगडा केला.
- 6 / 15
नेहा आणि रोहनप्रीत यांची पहिली भेट ऑगस्ट महिन्यात चंदीगढमध्ये झाली होती.
- 7 / 15
नेहा -रोहनची पहिली भेट एका गाण्याच्या निमित्ताने झाली होती. हे गाणं नेहाने लिहिलं असून तिनेच संगीतसुद्धा दिलं होतं.
- 8 / 15
या गाण्याच्या ऑडिशनसाठी रोहनला बोलावण्यात आल्याचं त्यावेळी दोघांनाही सांगण्यात आलं होतं.
- 9 / 15
त्यावेळी एकमेकांशी जुजबी ओळख झाल्यानंतर या दोघांनी गाणं शूट केलं.
- 10 / 15
गाण्याचं चित्रीकरण संपल्यानंतर नेहाने रोहनकडे त्याच्या स्नॅपचॅट आयडी मागितला. मात्र, रोहनने स्नॅपचॅट आयडी देण्याऐवजी तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला.
- 11 / 15
सुरुवातीच्या काळात नेहाशी बोलताना रोहन प्रचंड काचरत होता. तिच्याशी नेमकं काय बोलावं हे त्याला सुचत नव्हतं.
- 12 / 15
रोहनचा लाजाळू स्वभाव लक्षात घेत नेहानेच एकदिवस तिला लग्न करण्याची इच्छा आहे असं सांगितलं आणि त्याला प्रपोज केलं.
- 13 / 15
नेहाने प्रपोज केल्यानंतरही रोहन या लग्नासाठी फारसा तयार नव्हता.
- 14 / 15
मी केवळ २५ वर्षांचा आहे असंच रोहन वारंवार नेहाला सांगत होता. मात्र, काही काळ गेल्यानंतर रोहनने स्वत:च त्याचंदेखील नेहावर प्रेम असल्याचं कबूल केलं.
- 15 / 15
त्यानंतर काही कालावधीच या दोघांनी कुटुंबीयांच्या संमतीने लग्नगाठ बांधली.