‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती कार्तिकी गायकवाडचा शाही विवाहसोहळा
- 1 / 12
‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाडने व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली.
- 2 / 12
जुलै महिन्यात कार्तिकीचा साखरपुडा पार पडला.
- 3 / 12
आता मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्तिकी व रोनितचा विवाहसोहळा पार पडला.
- 4 / 12
या लग्नाला संगीत विश्वातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
- 5 / 12
कार्तिकी गायकवाड
- 6 / 12
कार्तिकी आणि तिचे वडील गायक-संगीतकार कल्याणजी गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लग्नाचं निमंत्रण दिलं होतं.
- 7 / 12
‘घागर घेऊन’, ‘नवरी नटली’ यांसारख्या खर्ड्या आवाजातील गाण्यांनी रसिकांना वेड लावणारी कार्तिकी अनेकांच्या लक्षात आहे.
- 8 / 12
लॉकडाउनच्या काळात म्हणजेच जुलै महिन्याच्या सुरुवातीला कार्तिकीचा शुभविवाह ठरला आणि साखरपुडाही पार पडला.
- 9 / 12
कार्तिकीने सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही सुखद बातमी दिली होती.
- 10 / 12
कार्तिकिचा पती रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे.
- 11 / 12
विशेष म्हणजे रोनितलाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे.
- 12 / 12
गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरू कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते. (सर्व छायाचित्र सौजन्य- फेसबुक)