‘तो’ फोटोपाहून अमृता खानविलकर म्हणाली ‘सेक्सी’, कोण आहे ऋतुजा बागवे?
- 1 / 18
ऋतुजा बागवे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय आहे. अलीकडेच तिने तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य - ऋतुजा बागवे इन्स्टाग्राम)
- 2 / 18
ऋतुजाने परळच्या महर्षी दयानंद महाविद्यलयात पदवी शिक्षण पूर्ण केलं. महर्षी दयानंद महाविद्यालय म्हणजे एम.डी. कॉलेज या नावाने सर्वश्रुत आहे.
- 3 / 18
ऋतुजाचं शालेय शिक्षण सैनिक शाळेतून झालं आहे.
- 4 / 18
एम. डी. कॉलेजने मला अभिनेत्री म्हणून घडवलं. अकरावीपासून टी. वाय.पर्यंत पाच वर्ष सलग मी या कॉलेजमधील नाटयविश्वात रमले होते असे तिने कॉलेज आठवणींचा कोलाजमध्ये सांगितलं होतं.
- 5 / 18
माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयातसुद्धा मी प्रवेश घेतला होता. तिथल्या एकांकिका आणि नाटय विभाग मला भारावणारा होता, असे ऋतुजाने सांगितलं.
- 6 / 18
सात वर्षांत तिने एकूण २२ एकांकिकांमध्ये सहभाग घेतला.
- 7 / 18
नॉट फॉर सेल, समथिंग क्रिएटिव्ह, स्मशानातील गुलमोहर, गेट सेट गो, उभे आडवे धागे, श्री तशी सौ, दादर व्हाया गिरगाव, थरारली वीट, कुंकू टिकल टॅटू, आयसीयू, सायलेंट स्क्रीम, जिलेबी या आणि अशा अनेक एकांकिका आम्ही गाजवल्या असे ऋतुजाने सांगितले.
- 8 / 18
खरेतर कॉलेजच्या वास्तूनेच मला धाकड बनवलं. माझ्यातली उत्तम अभिनेत्रीचे गुण जागे केले. एकदा आम्ही ‘नॉट फॉर सेल’ या एकांकिकेची तालीम करत होतो, तो अनुभव तिने सांगितला.
- 9 / 18
‘नॉट फॉर सेल’ मधील तिच्या भाईच्या भूमिकेला आयुष्यातला सर्वात पहिलावहिला अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
- 10 / 18
लालबागमधील दत्त बोर्डिग आणि क्षीरसागर हॉटेलमध्ये कोंबडी वडे खायला आम्ही अधूनमधून जायचो. सोलकढी पैज लावून प्यायचो ती आठवणही तिने सांगितली.
- 11 / 18
आजही नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला किंवा नवीन प्रोजेक्टच्या पहिल्या दिवशी मी कॉलेजला जाते. वास्तूला नमस्कार करते, मग कामाला सुरुवात करते असे तिने सांगितले.
- 12 / 18
जुलै महिन्यात अभिनेत्री ऋतुजा बागवेला करोनाची सौम्य लक्षणे जाणवली होती. त्यानंतर तिला घरातच क्वारंटाइन करून औषधोपचार करण्यात आले. तिच्या बाबांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. बाबा बरे होऊन घरी परत आले.
- 13 / 18
कलर्स वाहिनीवरील 'चंद्र आहे साक्षी'ला ही तिची मालिका सुरु झाली आहे. यात श्रीधरच्या भूमिकेत सुबोध भावे तर स्वातीच्या भूमिकेत ऋतुजा बागवे आहे.
- 14 / 18
'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून तिने छोटया पडद्यावर पदार्पण केले. आजही यातली तिची स्वानंदीची भूमिका प्रेक्षक विसरलेले नाहीत.
- 15 / 18
ऋतुजाने सोशल मीडियावर फोटोसाठी जी पोझ दिलीय ते पाहून अमृता खानविलकरही स्वत:ला रोखू शकली नाही. तिने हा फोटो पाहून 'सेक्सी' अशी कमेंट केली आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही या फोटोवर 'हॉटनेस' अशी कमेंट केली आहे.
- 16 / 18
अलीकडेच ऋतुजाने 'शहीद भाई कोतवाल' या सिनेमातून मोठया पडद्यावर पदार्पण केले. एकनाथ देसले व पराग सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
- 17 / 18
अल्पवधीत मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या ऋतुजा बागवेची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे.
- 18 / 18
आकर्षक व्यक्तीमत्व, सौंदर्य आणि अभिनय यांचा मिलाफ म्हणजे ऋतुजा बागवे.