कमाल झाली! सुपरहिरोंचा चित्रपट मात्र मुलांना प्रवेशबंदी; कारण…
- 1 / 10
मार्व्हल कंपनीच्या ‘अॅव्हेंजर्स’ला टक्कर देण्यासाठी डीसी कंपनीने ‘जस्टिस लीग’ या फिल्म सीरिजची निर्मिती केली होती. परंतु ही सीरिज दिग्दर्शक जॅक स्नायडरमुळे नेहमीच वादात राहिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 2 / 10
अंतर्गत मतभेद आणि आक्षेपार्ह दृश्यांमुळे स्नायडरचा ‘जस्टिस लीग’ प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी प्रेक्षक नाराज होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 3 / 10
अखेर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हा चित्रपट वेब सीरिजच्या रुपात आता दाखवला जाणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 4 / 10
या सीरिजला ‘द स्नायडर कट’ असं नाव देण्यात आलं आहे. परंतु ही सीरिज लहान मुलांना मात्र पाहता येणार नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 5 / 10
कारण वादग्रस्त संभाषण, अश्लिल दृश्य आणि एक्सट्रीम अॅक्शन सीन असल्यामुळे या सीरिजला आर रेडेट दर्जा मिळाला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 6 / 10
‘वॉचमन’, ‘300’, ‘मॅन ऑफ स्टील’, ‘लेजंड ऑफ द गार्डियन’ यांसारख्या अनेक धमाकेदार चित्रपटांची निर्मिती करणारा जॅक हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 7 / 10
परंतु त्याच्या दिग्दर्शनाची शैली अत्यंत आक्रमक आहे. परिणामी त्याचे गाजलेले चित्रपट कायमच आर रेटेड मूव्ही म्हणून ओळखले जातात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 8 / 10
असाच काहीसा प्रयोत तो जस्टिस लीग या सुपरहिरो सीरिजमध्येही करत होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 9 / 10
परंतु सुपरहिरो चित्रपटांचा टारगेट ऑडियंस प्रामुख्याने लहान मुलं असतात. अन् त्याने नेहमीच्याच शैलीत चित्रपटाची निर्मिती केली तर चित्रपटाला कोट्यवधींचं नुकसान होइल अशी शक्यता होती त्यामुळे अर्ध्यावरुनच निर्मात्यांनी त्याला बाहेर काढलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 10 / 10
परंतु जॅकचा फॅन फॉलोइंग फारच मोठा आहे. प्रेक्षक जवळपास चार वर्ष निर्मात्यांसोबत या चित्रपटासाठी लढत होते. अखेर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव 'द स्नायडर कट' वेब सीरिजच्या रुपात प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)