शेतकरीच खरा हिरो… या १० चित्रपटांमधून पाहा अन्नदात्याची संघर्षमय जीवनगाथा
- 1 / 10
दो बीघा जमीन - हा चित्रपट १९५३ साली प्रदर्शित झाला होता. गावातील श्रीमंत लोक कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्याचं कसं आर्थिक शोषण करतात. हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
- 2 / 10
पिपली लाईव्ह - हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली होती. कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या करण्याची घोषणा करतो. अशा वेळी राजकारणी आणि वृत्तमाध्यमं त्याचा कसा फायदा उचलतात हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
- 3 / 10
मंथन - हा चित्रपट १९७६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती देशभरातील शेतकऱ्यांनी पैसे गोळा करुन केली होती. दूधाचा नावाखाली होणारा भ्रष्टाचार या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
- 4 / 10
खाडी हवा - हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता. दुष्काळामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.
- 5 / 10
मोती बाग - हा लघुपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट एका ८० वर्षीय शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे.
- 6 / 10
उपकार - हा चित्रपट १९६७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'मेरे देश की धरती सोना उगले' हे गाणं आजही तितकच लोकप्रिय आहे.
- 7 / 10
गाभ्रीचा पाऊस - हा मराठी चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. दुष्काळामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.
- 8 / 10
मेरकु थोदार्ची मलाई - हा तामिळ चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. मजुरी करणाऱ्या एका गरीब शेतकऱ्याचं आयुष्य या चित्रपटात रेखाटलं गेलं आहे.
- 9 / 10
मदर इंडिया - हा चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर शेती करुन मुलांचं पालन पोषण करणाऱ्या एका आईची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेलेला हा पहिला चित्रपट होता.
- 10 / 10
निरोज गेस्ट - ही डॉक्युमेंट्री फिल्म २००९ साली प्रदर्शित झाली होती. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर आधारित हा चित्रपट आहे.