मनोज तिवारी यांनी घटस्फोटाच्या आठ वर्षांनंतर केलं लग्न; जाणून घ्या कोण आहे दुसरी पत्नी
- 1 / 8
भोजपुरी सिनेविश्वातून राजकारणात एण्ट्री करणारे भाजपाचे खासदार मनोज तिवारी वयाच्या ५० व्या वर्षी पुन्हा एकदा पिता बनले आहेत. मनोज तिवारी यांनी दुसरं लग्न केलं असून त्यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला.
- 2 / 8
सुरभी तिवारी असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे. सुरभी आणि मनोज तिवारी यांनी २०२० मध्ये लग्न केलं.
- 3 / 8
सुरभीसुद्धा भोजपुरी गायिका आहे. तिने अनेक लोकप्रिय भोजपुरी गाणी गायली आहेत.
- 4 / 8
सुरभीचा जन्म बिहारमधील पाटणा येथे झाला. याच ठिकाणी तिचं शिक्षणसुद्धा झालं.
- 5 / 8
मनोज तिवारी यांनी सुरभीच्या आधी रानी तिवारीसोबत लग्न केलं होतं.
- 6 / 8
१९९९ मध्ये रानी यांच्यासोबत मनोज तिवारी यांनी लग्न केलं होतं. १३ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी २०१२ मध्ये घटस्फोट घेतला.
- 7 / 8
रानी आणि मनोज यांना एक मुलगी आहे. जिया असं तिचं नाव असून ती आई रानीसोबतच मुंबईत राहते.
- 8 / 8
घटस्फोटाच्या आठ वर्षांनंतर मनोज तिवारी यांनी सुरभीशी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या आयुष्यात आता एका चिमुकलीचं आगमन झालं आहे.