मनोज तिवारी आणि श्वेता तिवारीमधील वाढती जवळीक पत्नीला नव्हती मान्य…
- 1 / 10
अभिनेता आणि भाजपा खासदार मनोज तिवारी मागच्या काही दिवसांपासून आपल्या खासगी जीवनामुळे चर्चेत आहेत. अलीकडेच मनोज तिवारी पुन्हा एकदा पिता बनले आहेत. त्यांची दुसरी पत्नी सुरभी तिवारीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मनोज तिवारींचा पहिली पत्नी रानी तिवारी बरोबर घटस्फोट झाला आहे.
- 2 / 10
मनोज तिवारींची पहिली पत्नी रानीने त्यांना २०१२ मध्ये घटस्फोट दिला. रानी आपली मुलगी ऋति सोबत मुंबईमध्ये राहते.
- 3 / 10
मनोज तिवारी आणि रानी तिवारीचे नाते खराब होण्यामागे अभिनेत्री श्वेता तिवारीचे नाव आले होते.
- 4 / 10
श्वेता तिवारी आणि मनोज तिवारींनी अनेक भोजपुरी चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते आहे.
- 5 / 10
रानी तिवारीला मनोज तिवारी आणि श्वेता तिवारीमधील वाढती जवळीक मान्य नव्हती असे वृत्त जनसत्ताने दिले आहे.
- 6 / 10
२०१० साली मनोज आणि श्वेता तिवारी रियालिटी शो बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाले होते. या शो मध्ये सुद्धा मनोज तिवारी यांनी श्वेताला सांगितले होते की, तिच्यावरुन पत्नी रानी अपसेट असते, आपल्यावर संशय घेते. (सर्व फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
- 7 / 10
शो मध्ये सुद्धा मनोज आणि श्वेता तिवारीमध्ये एक चांगली बाँडिंग दिसून आली होती.
- 8 / 10
शो मध्ये श्वेताच्या सांगण्यावरुन मनोज तिवारीने आपल्या मिशा सुद्धा कापल्या होत्या.
- 9 / 10
घटस्फोटानंतरही मनोज तिवारी आणि श्वेता तिवारी मध्ये मैत्रीचे नाते कायम होते.
- 10 / 10
एखादी पार्टी किंवा कार्यक्रमात मनोज तिवारी आणि श्वेता तिवारी एकत्र दिसतात. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आठ वर्षांनी २०२० मध्ये मनोज तिवारींनी दुसरे लग्न केले.