सुहाना खानच्या घायाळ अदा…ग्लॅमरस फोटोवर चाहते फिदा
- 1 / 6
बॉलिवूडच्या किंग खानची मुलगी सुहाना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर सुहाना जबरदस्त फोटो शेअर करत असते. नुकतेच सुहानाने मैत्रिणींसोबतचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(photo credit-instagram@suhanakhan2)
- 2 / 6
अमेरिकेतील न्यूयार्क शहरात सुहाना तिचं शिक्षण घेत आहे. शिक्षण घेत असतानाच सुहान तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवताना दिसते. मैत्रिणींसोबतच्या एका पार्टीचे फोटो सुहानाने शेअर केले आहेत. बॉडीकॉन ड्रेसमधील सुहानाचा हॉट लूक चाहत्यांना भुरळ घालतोय.
- 3 / 6
'पुन्हा कधीतरी, आता नाही' असं कॅप्शन देत सुहानाने फोटो शेअर केलाय. सोशल मीडियावर सुहान नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
- 4 / 6
सुहानाच्या या फोटोला सिनेसृष्टीतील अनेकांनी लाईकस् दिले आहेत. सुहानादेखील लवकरच बॉलिवूड सिनेमातून पदार्पण करणार अशा चर्चा सुरु आहेत.
- 5 / 6
न्यूयॉर्कमधील मित्र-मैत्रिणींसोबतच अनन्या पांडे, नव्या नवेली अशा अनेक स्टार किड्स सोबत सुहानाची जुनी मैत्री आहे.
- 6 / 6
लॉकडाउनच्या काळात सुहाना भारतात परतली होती. या काळात कुटुंबीयांसोबत तिने वेळ घालवला. मात्र पुढील शिक्षणासाठी सुहाना पुन्हा न्यूयॉर्कला परतली आहे. मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय करतानाचे फोटो सुहाना कायम सोशल मीडियावर शेअर करत असते.(photo credit-instagram@suhanakhan2)