श्रीधरने दिलेल्या धोक्यामधून सावरलेली स्वाती आता संग्रामसोबत अडकणार लग्नबंधनात!
- 1 / 10
स्वाती आयुष्यात आलेल्या कसोट्यांना आजवर खूप धीराने सामोरी गेली.
- 2 / 10
कितीही खडतर प्रवास असला तरी देखील तिने न खचता त्यांना तोंड दिले.
- 3 / 10
कठीण परिस्थितीत नात्यांची कसोटी नात्यातील ऋणानुबंधाचे धागे मजबूत करते हे अगदी खरे.
- 4 / 10
आता स्वातीच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची चाहूल लागली आहे.
- 5 / 10
संग्रामच्या येण्याने स्वाती आता कुठेतरी श्रीधरने दिलेल्या धोक्यामधून बाहेर येऊ लागली आहे.
- 6 / 10
या सगळ्यामध्ये स्वातीला आता संग्रामची खंबीर साथ मिळाली आहे.
- 7 / 10
काही दिवसांपूर्वी संग्रामने स्वातीला लग्नाची मागणी घातली होती.
- 8 / 10
श्रीधरकडून झालेल्या फसवणुकीनंतर स्वातीसाठी हा निर्णय घेण थोडसं कठीण होतं... पण, अखेर तिने निर्णय घेतला...
- 9 / 10
“तो क्षण आता आला आहे” स्वाती आणि संग्राम आता लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जाणार आहेत...
- 10 / 10
स्वातीच्या आयुष्याला आता नव्याने सुरुवात होणार आहे...