‘महिला कलाकारांनी माझे शोषण केले होते’, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
- 1 / 17
पाकिस्तानी अभिनेता अजफर रहमान हा अतिशय लोकप्रिय आहे.
- 2 / 17
तो गेल्या १५ वर्षांपासून पाकिस्तानी चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. त्याने आजवर अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करत चाहत्यांची मने जिंकली आहेत.
- 3 / 17
अजफरचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीला काही महिला कलाकारांनी शोषण केल्याचा खुलासा त्याने एका मुलाखतीमध्ये केला आहे.
- 4 / 17
अजफर रहमानने बेगम नवाजिश अली यांना नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या करिअरमधील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
- 5 / 17
'मी आमच्या कुटुंबातील इतर मुलांपेक्षा थोडा वेगळा होतो. जेव्हा तुमचे चारही भाऊ CA असतात आणि तुम्ही ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल टाकता तेव्हा तुमच्यासाठी सगळं काही कठिण असते. आज मी जिथे आहे तिथपर्यंत पोहोचायला मला खूप मेहनत घ्यावी लागली आहे' असे अजफर म्हणाला.
- 6 / 17
सुरुवातीच्या काळात फिल्म इंडस्ट्रीमधील प्रवासाविषयी बोलताना तो म्हणाला, 'मला स्वत:मध्ये असा बदल घडवून आणणे कठिण होते ज्याला इंडस्ट्री आपलंसं करुन घेईन.'
- 7 / 17
त्यानंतर अजफरने स्वत:वर एक पुस्तक लिहिण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच या पुस्तकावर चित्रपट तयार करण्यासाठी दिग्दर्शकाला सांगेन असे देखील त्याने म्हटले आहे.
- 8 / 17
पुढे तो म्हणाला, 'ही एक सामान्य मुलाची कथा आहे, जो खूप मोठी स्वप्न पाहातो, जो फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करु इच्छितो आणि त्यासाठी तो खूप वेगवेगळ्या गोष्टी करतो.'
- 9 / 17
दरम्यान अजफरने, जीवनात पुढे जाण्यासाठी नेहमी स्वत:शी स्पर्धा ठेवा असा सल्ला दिला आहे.
- 10 / 17
इंडस्ट्रीमध्ये कधी काम मिळवण्यासाठी दिग्दर्शकांकडे मागणी करावी लागली नाही असा खुलासा अजफरने केला.
- 11 / 17
'जर तुमचे काम त्यांना आवडले तर ते तुम्हाला नक्की काम देतील' असे अजफर म्हणाला.
- 12 / 17
अजफरला मुलाखतीमध्ये मीटू चळवळी विषयी देखील विचारण्यात आले होते. त्यावर त्याने त्याचे मत मांडले होते.
- 13 / 17
'हा खूप संवेदनशील विषय आहे. कोणाचेही शोषण होणे हे चुकीचे आहे. सर्वांना जगण्याचा आधिकार आहे आणि त्या व्यक्तीला त्याच्या पद्धतीने जीवन जगण्याचा आधिकार आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही एखाद्या सोबत गैरवर्तन कराल' असे अजफर म्हणाला.
- 14 / 17
त्यानंतर अजफरने त्याचे काही महिला कलाकारांकडून शोषण झाल्याचे सांगितले.
- 15 / 17
'मला नाही माहिती सोशल मीडियावर एखाद्या विषयी खुलासा करणे कितपत योग्य आहे. एक पुरुष कलाकार असल्यामुळे काही महिला कलाकरांनी माझे शोषण केले होते. मी त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही कारण मी आता त्या गोष्टी विसरुन पुढे आलो आहे. पण महिला नेहमी बरोबर असतात असे नाही' असे अजफर म्हणाला आहे.
- 16 / 17
अजफरने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
- 17 / 17
त्यासाठी त्याने ऑडिशन पण दिले होते. पण त्याला रिजेक्ट करण्यात आले.