‘तूझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’, टॉपलेस फोटोशूटमुळे अभिनेत्री झाली ट्रोल
- 1 / 10
बोल्ड फोटोशूट केल्यामुळे अनेक अभिनेत्री नेहमीच चर्चेत असतात. कधीकधी त्यांना या फोटोंमुळे ट्रोल देखील केले जाते. असेच काहीसे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या अग्रवालसोबत झाले आहे.
- 2 / 10
दिव्या अग्रवालने काही दिवसांपूर्वी टॉपलेस फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- 3 / 10
या फोटोमध्ये तिने जीन्स परिधान केली असून अपर बॉडी फुलांनी झाकली आहे.
- 4 / 10
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
- 5 / 10
या फोटोंवरुन काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी तिला ट्रोल केले.
- 6 / 10
दियाने तिला ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंटचे काही स्क्रिनशॉट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला शेअर केले आहेत.
- 7 / 10
एका नेटकऱ्याने, 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. असे फोटोशूट करुन तुला काय मिळाले' अशी कमेंट केली होती.
- 8 / 10
याचा स्क्रिनशॉट शेअर करत दिव्याने 'मी एक कॉन्सेप्ट फोटोशूट केले आहे. तुम्ही कोणाला सांगू शकत नाही की त्याने कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत. एखाद्या व्यक्तीचे कॅरेक्टर हे त्याच्या कपड्यांवरुन ठवरवले जाते हे खूप वाईट आहे' असे म्हटले आहे.
- 9 / 10
दिव्याने स्प्लिट्सविला १० या शोमध्ये सहभाग घेतला होता.
- 10 / 10
त्यानंतर तिने रागिनी एमएमएस रिटर्न्स या चित्रपटात भूमिका साकारली होती.