‘तारक मेहता…’मध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री?
- 1 / 11
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, बबीता, चंपकलाला, मिसेस हाती ही सगळीच पात्र कायम चर्चेत असतात. पण दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. आता मालिकेत नव्या दयाबेनची एण्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.
- 2 / 11
ही अभिनेत्री म्हणजे राखी विजन असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
- 3 / 11
राखी दयाबेनच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
- 4 / 11
राखीने एका मुलाखतीमध्ये दयाबेन हे पात्र साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती.
- 5 / 11
पण मालिकेच्या निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
- 6 / 11
राखीने या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली.
- 7 / 11
या मुलाखतीमध्ये तिने ‘दयाबेन हे एक आयकॉनिक कॅरेक्टर आहे. कोणतीही अभिनेत्री दयाबेन साकारु शकत नाही' असे म्हटले.
- 8 / 11
पुढे ती म्हणाली, 'मला जर हे पात्र साकारण्याची संधी मिळाली तर नक्कीच चांगल्या प्रकारे साकारण्याचा प्रयत्न करेन. प्रेक्षकांना हसवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.'
- 9 / 11
अभिनेत्री दिशा वकानी गेल्या कित्येक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत काम करत आहे.
- 10 / 11
पण २०१७ पासून ती मालिकेत दिसत नाही.
- 11 / 11
चाहते तिच्या परत येण्याची वाट पाहात आहेत. अशातच आता राखी दयाबेनच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.