-
आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचा आज वाढदिवस. १२ मार्च, १९८४ रोजी दुर्गापूर इथल्या बंगाली कुटुंबात तिचा जन्म झाला. बालपणापासूनच श्रेयाला संगीताची आवड होती. अवघ्या चार वर्षांची असल्यापासून तिने संगिताचे धडे शिकण्यास सुरूवात केली.
-
दूरदर्शनवरील 'सारेगमप ' या शोमध्ये तिने भाग घेतला होता. इथंपासूनच तिच्या संगित क्षेत्रातील कारकिर्दिला सुरुवात झाली. त्यानंतर 2000 सालात तिने पुन्हा दुसऱ्यांदा 'सारेगमप ' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. या शोमध्ये गेस्ट म्हणून आलेल्या संजय लीला भन्साळींना श्रेयाच्या आवाजाने भूरळ घातली.
-
. 2002 सालात आलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' सिनेमातून श्रेयाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. या सिनेमातील श्रेयाने गायलेलं ‘मोरा पिया’ आणि ‘डोला रे डोला’ ही गाणी तुफान गाजली. पहिल्याच चित्रपटासाठी श्रेयाला प्लेबॅक सिंगर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर श्रेयाने मागे वळून पाहिलं नाही.
-
मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी अशा जवळपास 14 भाषांमध्ये श्रेयाने आजवर गाणी गायली आहेत. तर 200 हून अधिक सिनेमांसाठी तिने पार्श्वगायन केलं आहे.
-
अवघ्या 26 व्य वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी श्रेया पहिली भारतीय गायिका आहे. श्रेयाला आतापर्यंत एकूण 4 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
-
संगीत क्षेत्रात श्रेया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आपली गुरू मानते.
-
अमेरिकेतल्या ओहिओ राज्यात २६ जून हा दिवस ‘श्रेया घोषाल डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तिची गाणी तिथे ऐकली जातात.
-
अनेक वर्षांच्या अफेअरनंतर श्रेयाने २०१५ मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ बांधली. श्रेयाचा पती मुंबईतील एका टेक्नॉलोजी कंपनीचा मालक आहे.
-
बंगाली पद्धतीने श्रेया-शिलादित्यचं लग्न झालं.श्रेया अनेकदा तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
काही दिवसांपूर्वीच श्रेयाने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत श्रेयाने चाहत्यांसोबत ही गूड न्यूज शेअर केली. ”बेबी श्रेयादित्य लवकरच येत आहे." असं कॅप्शन देते श्रेयाने तिचा बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला होता.
-
श्रेयाच्या आवाजासोबतच तिचं सौदर्यही अनेकांना भुरळ घालतं. सोशल मीडियावर श्रेयाचे लाखो चाहते आहेत. तसचं देश विदेशात श्रेयाने तिच्या आवाजाच्या जादूने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.(photo-instagram@shreyaghoshal)
