सोनाली कुलकर्णीचा ‘नो मेकअप’ लूक; चाहत्यांनी केलं कौतुक
- 1 / 10
. आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घाय़ाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
- 2 / 10
सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. वेगवेगळ्या लूकमधील आणि वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करून ती चाहत्यांना भुरळ घालत असते.
- 3 / 10
कोणताही लूक असो सोनालीचं सौंदर्य प्रत्येक लूकमध्ये चाहत्यांना भुरळ घालतं.
- 4 / 10
मात्र नुकतेच सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. सोनालीने कोणताही मेकअप न करता तिचे फोटो चाहत्यासोबत शेअर केले आहेत. या फोटोत चाहत्यांना सोनालीचं खरं रुप पाहायला मिळतंय.
- 5 / 10
मेकअप नसतानाही सोनाली या फोटोंमध्ये सुंदर दिसतेय. यात सोनालीने तिच्या केसात एक फूल माळल्याचं दिसतंय. तसंच सोनालीने तिचा होणारा पती कुणाल बेनोडेकर याच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत.
- 6 / 10
सोनालीच्या या 'नो मेकअप' लूकला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. एवढचं नाही तर सोनालीच्या धाडसाचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
- 7 / 10
अनेक सेलिब्रिटी हे कायम मेकअपमध्ये वावरतात. मेकअप शिवाय कॅमेरासमोर येणंही ते टाळतात. मात्र सोनालीने कशाचीही पर्वा न करता तिचे बिना मेकअपमधील फोटो शेअर केल्याने चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
- 8 / 10
अनेक चाहत्यांनी सोनालीच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. "खरी सौदर्यवती, मेकअपची गरज नाही." असं एकाने म्हंटलं आहे. तर एका युजरने "जगातील सुंदर स्त्री", "यासाठी धैर्य लागतं." अशा कमेंट करत चाहत्यांनी सोनालीच्या धाडसाचं कौतुक केलंय.
- 9 / 10
लवकरच सोनाली 'झिम्मा' या सिनेमातून झळकणार आहे. तर येत्या काळात ती 'छत्रपती ताराराणी' या सिनेमातून झळकणार आहे.
- 10 / 10
याचसोबत लवकरच सोनाली एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी सज्ज झालीय. सोनाली भाऊ अतुल कुलकर्णी याच्यासोबत निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. सोनाली ‘हाकामारी’ या सिनेमाची निर्मिती करणार आहे.(all photos- instagram@sonalee18588)