करणची मुलं झाली मोठी…वडिलांचे शूज घालून केलं फोटोशूट!
April 6, 2021 5:17 PM
- 1 / 6
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो.
- 2 / 6
करण जोहरला यश आणि रुही अशी जुळी मुलं आहेत. २०१७ साली सरोगसीच्या माध्यमातून यश आणि रुहीचा जन्म झाला आहे.
- 3 / 6
करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यश आणि रुहीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये यश आणि रुहीने हिरव्या रंगाचे टी-शर्ट, काळ्या रंगाची कॅप आणि त्याला मॅचिंग असे शूज त्याचसोबत गॉगलही घातले आहेत.
- 4 / 6
यश आणि रुही यांनी करणचे शूजही घातलेले या फोटोंमध्ये दिसत आहे.
- 5 / 6
यश आणि रुहीसोबतच्या मस्तीचे फोटो, व्हिडिओ करण बऱ्याचदा अपलोड करत असतो. त्याच्या चाहत्यांमध्ये हे फोटो, व्हिडिओज खूप व्हायरलही होतात.
- 6 / 6
(सर्व फोटो सौजन्य : करण जोहर /इन्स्टाग्राम)