-

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना एकत्र काम करण्याची इच्छा नाही. काहींची वैयक्तिक कारणे आहेत तर काहींची इतर दुसरी. चला तर जाणून घेऊया या कलाकारांबद्दल…
-
सलमान खान आणि दीपिका पदूकोण – बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि बॉलिवबडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण या दोघांनी एकत्र काम केलं पाहिजे, अशी त्या दोघांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, दीपिकाने 'सुल्तान' चित्रपटासाठी नकार दिल्यानंतर सलमानला राग आला आणि त्यांनतर तिच्यासोबत कोणता ही चित्रपट न करण्याचा निर्णय सलमानने घेतला.
-
शाहरूख खान आणि अजय देवगण – बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि अभिनेता अजय देवगण यांचे देखील चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यामुळे यांच्यात वाद झाले होते. तर, काजोलने शाहरूखसोबत काम केलेले अजयला मुळात आवडत नाही.
-
रणबीर कपूर आणि कंगना रणौत – बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत आणि रणबूर कपूर यांच्यातील भांडन चित्रपटाच्या प्रदर्शनावरून झालं होत. ज्या दिवशी रणबीरचा 'रॉकस्टार' आणि कंगनाचा 'रिव्हॉल्वर राणी' हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता.
-
जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू – बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि हॉट जोडींपैकी एक जोडी म्हणजे जॉन आणि बिपाशाची होती. हे दोघे बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्या दोघांमध्ये झालेल्या वादामुळे ते विभक्त झाले.
-
सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन – विश्व सुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान रिलेशनशिपमध्ये आले. ऐश्वर्या आणि सलमान २ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. सलमानला ऐश्वर्याशी लवकरात लवकर लग्न देखील करायचे होते. मात्र, सलमानचा तापट स्वभाव आणि त्या दोघांमध्ये सतत सुरू असणाऱ्या भांडणांमुळे ऐश्वर्या आणि सलमानचा ब्रेकअप झाला.
-
प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर खान – बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खानने एका चित्रपटात प्रियांकाची जागा घेतली. त्यांच्यातील वाद कधीच संपले नाही. मात्र, करीना आणि प्रियांका या दोघांनी 'कॉफी विथ करण' या शोमध्ये एकत्र हजेरी लावली होती.
-
अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर – अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांनी एकत्र बरेच हिट चित्रपट केले. हे दोघे बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये देखील होते. एवढंच नाही तर यांचा साखरपूडा देखील झाला होत. मात्र, काही कारणांमुळे ते विभक्त झाले.
‘या’ बॉलिवूड कलाकारांना एकमेकांसोबत करायचे नाही काम, जाणून घ्या त्यांच्याविषयी..
Web Title: Know about the bollywood celes who do not want to work together dcp