-
बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहची चर्चेत येते. कंगना सोशल मीडियावर बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. आता कंगनाने भारतातील वाढत्या लोकसंख्येवर संतप्त होऊन ट्वीट केले आहे. या ट्वीटमुळे कंगना ट्रोल झाली आहे.
-
‘आपल्याला लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कायद्यांची गरज आहे. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी मतदानाचे राजकारण करत असताना लोकांची जबरदस्तीने नसबंदी केली. ज्यामुळे त्या निवडणूक हरल्या आणि नंतर त्यांची हत्या देखील करण्यात आली. परंतु, आजच्या काळात भारताची वाढती लोकसंख्या आपल्यासाठी संकट आहे. एखाद्याला तिसरं मूल झालं तर त्याला दंड किंवा काही वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे,’ अशा आशयाचे ट्वीट करत कंगनाने वाढत्या लोकसंख्येवर वक्तव्य केलं आहे.
-
अनेकांनी यावरून कंगनाला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'हे दुसर्या अपत्यावर असायला पाहिजे! तू देखील दुसरे मूल आहेस ना?'
-
दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुझा भाऊ अक्षत लहान असल्यामुळे तुझ्या आई-वडीलांना तुरूंगात टाकले तर तुला काय वाटेल? तू चुकीच बोलत नाही परंतु जेव्हा एखादी गोष्ट आपल्यावर येते तेव्हा गोष्टी कठीण होतात. सद्गुरूसुद्धा चौथे अपत्य आहे. या कायद्यामुळे आपण त्यांच्या सारख्या महान व्यक्तीला गमावले तर काय?'
-
'ही कधीच वर्तमानपत्र वाचत नाही ही फक्त व्हॉटसअॅपचे मेसेज वाचते,' अशा आशयाचे ट्वीट एका नेटकऱ्याने केले
-
एक नेटकरी म्हणाला, 'आणि अशा सर्वांच्या तिन्ही मुलांचा सांभाळ तू कर बाई. आई वडील तुरुंगात गेल्यावर मुलं कुठे जाणार?'
-
तर एकाने एक फोटो शेअर केला आणि म्हणाला, 'सुरूवात तुझ्या आई-वडीलांना तुरूंगात पाठवण्यापासून करूया.'

“…तर संपूर्ण भारत भाजपाला मतदान करेल”, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचं लोकसभेत अमित शाहांना आव्हान