-
सध्याची झी मराठी वाहिनीवरील सर्वांची आवडती मालिका म्हणजे 'देवमाणूस.' या मालिकेतील प्रत्येक कलाकार चर्चेत असतो. पण मालिकेसाठी कलाकार किती मानधन घेत असतील असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला जाणून घेऊया देवमाणूस मालिकेतील कलाकारांच्या मानधना विषयी…
-
मालिकेत अजित कुमार देवची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने साकारली आहे.
-
किरण प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास २० हजार रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
देवमाणूस मालिकेतील सरु आजींनी अनेकांची मने जिंकली आहेत. सरु आजींची भूमिका अभिनेत्री रुक्मिणी सुतार यांनी साकारली आहे.
-
त्या प्रत्येक एपिसोडसाठी १५ हजार रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
डिम्पलची भूमिका अभिनेत्री अस्मिता देशमुख साकारत आहे.
-
ती एका भागासाठी १७ हजार रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चां रंगल्या आहेत.
-
मालिकेत टोण्या ही भूमिका बालकलाकार विरल माने करत आहे.
-
तो एका भागासाठी १० हजार रुपये घेत असल्याचे म्हटले जाते.
-
नुकताच 'देवमाणूस' मालिकेत चंदा या पात्राची एण्ट्री झाली. चंदा ही भूमिका अभिनेत्री माधुरी पवार साकारत आहे.
-
माधुरी ही एका एपिसोडसाठी १४ हजार रुपये घेत असल्याचे म्हटले जाते.
-
मंगल ही भूमिका अंजली जोगळेकर साकारत आहे.
-
ती एका भागासाठी १२ हजार रुपये घेत असल्याचे म्हटले जाते.
-
मालिकेत बज्या ही भूमिका अभिनेता किरण डांगे साकारत आहे.
-
तो एका भागासाठी जवळपास ११ हजार रुपये घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
एसीपी दिव्या सिंहची भूमिका अभिनेत्री नेहा खान साकारत आहे.
-
नेहा एका एपिसोडसाठी आठ हजार रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
मालिकेतील आर्या ही भूमिका अभिनेत्री सोनाली पाटीलने साकारली होती.
-
सोनाली एका भागासाठी १६ हजार रुपये घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मुंबईत कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; नेमकं कारण काय?