-
श्रावण महिना म्हंटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, पण त्यातही मंगळागौर म्हटलं की, महिलांचा विशेष उत्साह दिसून येतो.
-
हाच उत्साह अनेक मालिकांमधून देखाल पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जाणार आहे.
-
मंगळागौरीसाठी चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली आहे.
-
लतिकाने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत
-
इतर महिलांसोबत लतिका देखील मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे.
-
लतिकाची बँकेतील मैत्रीण रूपाली हिची ही मंगळागौर साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळेच मंगळागौरीची पारंपरिकरित्या पूजा करण्यात आली आहे.
-
सगळ्या बायका मिळून मोठया उत्साहात मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत. या पूजेसाठी रसिकाने धुमाळ आणि जहागीरदार कुटुंबाला आमंत्रण दिले आहे.
-
मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार आहे.
-
मालिकेमध्ये नवं वळणं येणार असलं तरी या मंगळागौरीच्या खेळाची मजा सेटवर सर्वांनीच लुटली आहे.
-
नेहमीप्रमाणेच खास वेषभूषा केल्याने फोटो काढण्याची संधी कलाकारांनी सोडलेली नाही.
बाजारात मिळणाऱ्या १० रुपयांच्या ‘या’ पांढऱ्या रंगाच्या भाजीने सांध्यातील युरिक अॅसिड वितळून निघेल; दुखण्यापासून मिळेल कायमचा आराम