-
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘मन उडू उडू झालं’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे.
-
येत्या ३० ऑगस्टपासून रात्री ७.३० वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.
-
या मालिकेच्या प्रोमोवर लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
-
हृताने यापूर्वीच आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे.
-
हृतासोबत या मालिकेत एक नवा चेहरा पाहायला मिळत आहे.
-
या मालिकेत प्रमुख अभिनेता नेमका कोण आहे? याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
-
‘मन उडू उडू झालं’या नव्या मालिकेत हृतासोबत झळकणाऱ्या या अभिनेत्याचे नाव अजिंक्य राऊत असे आहे.
-
अजिंक्य राऊत हा मूळचा परभणीचा आहे.
-
अजिंक्यने यापूर्वी मॉडलिंग क्षेत्रात नशीब आजमावले आहे.
-
मॉडलिंग करत असताना अजिंक्यला विठू माऊली या मालिकेत झळकण्याची संधी मिळाली होती.
परभणीत असताना त्याने मराठी भाषेत प्रभूत्व मिळवले. -
त्यानंतर त्याने त्याच्या दिसण्यावर आणि अभिनयावर प्रचंड मेहनत घेतली.
-
विशेष म्हणजे तो उत्कृष्ट डान्सरही आहे.
-
‘मन उडू उडू झालं’या मालिकेतील प्रोमोमध्ये अजिंक्य फारच सुंदर दिसत आहे.
-
या प्रोमोतील अभिनयामुळे अजिंक्यने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

१०० वर्षानंतर दोन ‘शुभ राजयोग’ जुळून आल्याने जानेवारीपासून ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? बुधदेव देऊ शकतात बक्कळ पैसा