
२ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी लोकांना ताब्यात घेण्यात आले. तेव्हापासून आर्यनची आई गौरी ही सतत चर्चेत आहे.
गौरीला तीन मुलं असून आर्यन, सुहाना आणि अबराम अशी त्यांची नावं आहेत. गौरी ही फक्त शाहरुखची पत्नी म्हणून ओळखली जात नाही, तर भारतातील लोकप्रिय इंटेरिअर डिझाइनर्सपैकी एक आहे.
आर्यनच्या अटकेनंतर गौरी कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेत आली होती चला पाहूया…
अटकेनंतर गौरी आणि आर्यनमध्ये झालेला व्हिडीओ कॉल – तुरुंगातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, ‘आर्यनने त्याच्या आईचा फोन नंबर दिला होता. त्या नंबरवर आर्यनने आई आणि वडिलांना व्हिडीओ कॉल केला होता.’
जवळपास १० मिनिटे त्यांच्यामध्ये संवाद झाला. दरम्यान आर्यनला पाहून गौरी खानला रडू कोसळले आहे.’ आर्थर रोड जेलमध्ये व्हिडीओ कॉल ही सुविधा करोना काळात सुरु झाली आहे. जेणे करुने कैद्यांना त्यांचे वकील आणि कुटुंबीयांशी संवाद साधता येईल.
आर्यनच्या सुटकेसाठी केला होता नवस – दसरा या निमित्त ठिकठिकाणी जल्लोषाचे वातावरण बोते. तरीही मन्नतमध्ये मात्र कोणतेही सेलिब्रेशन यंदा करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे नवरात्री दरम्यान गौरीने आर्यनच्या सुटकेसाठी नवसही केला होता.
मन्नतमध्ये गोड पदार्थ न बनवण्याचे आदेश – जोपर्यंत आर्यनची सुटका होत नाही, तोपर्यंत घरात कोणत्याही प्रकारचे गोड पदार्थ केले जाणार नाही, असे स्पष्ट आदेश गौरीने घरातील सर्व नोकरांना दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी तिच्या घरातील एक नोकर हा खीर बनवत होता. मात्र त्यावेळी तिने त्याला खीर बनवू नकोस, असे सांगितले. यानंतर त्याला तात्काळ थांबायला सांगितलं. तसेच यापुढे घरात गोडधोड बनवायचे नाही,” असेही आदेश तिने दिले.
आर्यनला भेटल्यानंतर गौरीचे अश्रु झाले होते अनावर – काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत एनसीबी ऑफिसमध्ये असलेल्या आर्यनला भेटल्यानंतर गौरी भावूक झाल्याचे दिसत होते.
सतत फोटोग्राफर्स फोटो काढत असल्याचे पाहून गौरीने तिचा चेहरा लपवला होता.
कोठडीत असणाऱ्या आर्यनसाठी McD चे बर्गर घेऊन गौरी पोहोचली होती – आर्यनला नीट जेवायला मिळत नसणार हा विचार करता गौरी त्याच्यासाठी McD चे काही बर्गरसोबत घेऊन गेली होती.
मात्र, एनसीबीने विनम्रपणे गौरीची ही विनंती नाकारली आणि सुरक्षा कारणास्तव यासाठी नकार दिला.
गौरीजवळ गांजा असल्यामुळे तिला एकदा विमानतळावर अडवण्यात आलं होत – फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, बर्लिन विमानतळावर गौरीला गांजासोबत पकडलं होतं. मात्र, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र,
त्यावेळी माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, गौरीकडे गांजा सापडला होता. तिने तो वैयक्तिक वापरासाठी सोबत बाळगल्याची कबुली दिली होती. अनेक माध्यमांनी गौरीला ड्रग अडिक्ट असंही संबोधलं होतं. मात्र, तिने हे वृत्त फेटाळलं होतं.
दरम्यान, आज सकाळी ९ वाजता शाहरुखने आर्थर रोज तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली. (All Photo Credit : Gauri Khan Instagram)